मुंबई - कोरोनानंतर आता बर्ड फ्ल्युचे संकट राज्यावर दिसत आहे. परभणीमध्ये बर्ड फ्ल्यू पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. आता बर्ड फ्ल्यू महाराष्ट्रात पसरू नये यासाठी सरकार ऍक्टिव्ह झाले आहे. आज (दि. 11 जाने.) संध्याकाळी 5 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बर्ड फ्लूबाबत बैठक घेणार आहेत. या बैठकीत राज्यात प्रादुर्भाव होत असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांशी ही मुख्यमंत्री बोलणार आहेत. या शिवाय पशु संवर्धन अधिकाऱ्यांशीही बोलणार आहेत.
काही दिवसांपूर्वी परभणी व बीडमध्ये कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. भोपाळच्या प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालानुसार या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे असून जिल्हापातळीवर उपाययोजना सुरू आहे.
ज्या ठिकाणी पक्षी मरण पावले आहेत. त्या ठिकाणीच्या दहा किलोमीटरचे क्षेत्र हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या क्षेत्रातून कोणतेही पक्षी इतर ठिकाणी नेले जाणार नाहीत. तसेच मुरुंबा गावातील एक किलोमीटर परिसरातील सर्व कोंबड्या तसेच पाळीव पक्षी नष्ट करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे एक वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले असून, ते गावातील सर्व लोकांची तपासणी करत आहे.
रत्नागिरीतील दापोली आणि मुंबईतील चेंबूरमधील कावळ्यांचा तसेच ठाण्यातील पोपटांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूनेच झाल्याचेही प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालात नमूद केले आहे. यामुळे शासनाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत. आज (सोमवार) मुख्यमंत्री देखील पुढे काय करता याबाबत विशेष बैठक घेणार आहेत.
हेही वाचा - महाराष्ट्रात 'बर्ड फ्ल्यू'चा शिरकाव.. परभणीत ८०० कोंबड्या दगावल्या, मु्ख्यमंत्री घेणार आढावा
हेही वाचा - ईटीव्ही एक्सक्लुजीव : कोरोना लस देशभर पोहोचवण्यासाठी 'कुल एक्स कोल्ड चैन' सज्ज