ETV Bharat / state

सफाई कामगार संघटनेकडून महापुरुषांची संयुक्त जयंती उत्साहात - mumbai

महात्मा फुले यांनी बहुजनांना शिक्षणाची दारं खुली करुन दिली. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा, असा संदेश दिला. तर सुशासनाची परंपरा मजबूत करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपले आयुष्य खर्च केले. डिजे लावून या तिन्ही महापुरुषांची जयंती साजरी करण्यापेक्षा त्यांच्या विचारांचे आचरण करणे गरजेचे आहे.

सफाई कामगार संघटनेकडून महापुरुषांची संयुक्त जयंती उत्साहात
author img

By

Published : May 4, 2019, 7:51 PM IST

Updated : May 5, 2019, 11:40 PM IST

मुंबई - कामगारांच्या हक्काचे संरक्षण आणि माणसाला माणूस बनवण्यासाठी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी संघर्ष केला. म्हणूनच कोणताही धांगडधिंगा न करता केवळ महापुरुषांचे विचार समाजात रुजवत मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या एफ-उत्तरमधील सफाई कामगारांच्या सकाळपाळी कामगार संघटनेकडून अनोख्या पद्धतीने महापुरुषांचा संयुक्त जयंती उत्सव साजरा करण्यात आला.

सफाई कामगार संघटनेकडून महापुरुषांची संयुक्त जयंती उत्साहात

महात्मा फुले यांनी बहुजनांना शिक्षणाची दारं खुली करुन दिली. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा, असा संदेश दिला. तर सुशासनाची परंपरा मजबूत करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपले आयुष्य खर्च केले. डिजे लावून या तिन्ही महापुरुषांची जयंती साजरी करण्यापेक्षा त्यांच्या विचारांचे आचरण करणे गरजेचे आहे. डिजे लावून जयंती साजरी करणे म्हणजे एकप्रकारे महामानवांच्या जयंतीचे विद्रुपीकर आहे. या महापुरुषांचे विचार समाजात रुजवणे आवश्यक आहे. हा विचार करूनच मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या एफ-उत्तरमधील सफाई कामगारांच्या सकाळपाळी कामगार संघटनेकडून या संयुक्त जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. संघटनेचे अध्यक्ष अनिल सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली सामुदायिक बुद्धवंदनेने या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. त्यानंतर संघटनेचे चिटणीस प्रकाश जाधव यांनी सकाळपाळी कामगार संघटनेची प्रस्तावना उपस्थितांसमोर सादर केली.

यानतर आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सभेत बहुजन महापुरुषांच्या जीवनावर अभ्यासपूर्ण व्याख्याने आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम पार पडले. यावेळी मुख्य प्रवक्ते विजय वाडवळ यांनी उपस्थित सफाई कामगारांशी संवाद साधून कामगारांचे प्रबोधन केले. सफाई कामगार हे त्यांच्या कामाच्या स्वरूपामुळे दारूच्या आहारी जात आसल्याचे दिसत आहे. त्यामुळे सर्व कामगारांनी एकत्र येऊन दारू न पिता काम करण्याचा संकल्प करा, असा सल्ला यावेळी मुख्य प्रवक्ते विजय वाडवळ यांनी दिला. यावेळी माजी कमिटी सदस्यांचा आणि सफाई कामगारांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. अशाप्रकारचे प्रबोधन महोत्सव ठिकठिकाणी झाले पाहिजे, अशी अपेक्षाही माजी अध्यक्ष विजय उघडे यांनी यावेळी व्यक्त केली. बापू जाधव यांनी आपल्या अनोख्या शैलीत या उत्सवाचे सूत्रसंचालन केले.

या उत्सवासाठी विनोद पेडणेकर, ऋषी, राजू, राजेश, वसंत, संतोष गर्जे, मनसुद भाई, विवेक कांबळे, रितेश सकपाळ, जितेंद्र कांबळे, हरी मानगेकर, या सर्व मंडळीचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी सुशांत भोसले, किरण यादव, अभय सकपाळ, किरण धारिया, संतोष जाधव, कुंदन सोनवणे, मंगेश जाधव, मोहन पिसाळ, वैभव सकपाळ, राजू कांबळे या सर्व कार्यकर्त्यांनी हा उत्सव यशस्वी करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेतली.

Intro:बातमीला व्हिडीओ एफटीपी करीत आहेत.
Slug- MH_Mumbai_SafaiKamgar_SanyuktJayanti_AV_4May2019_PramilaPawar

मुंबई

कामगारांच्या हक्काचं संरक्षण आणि माणसाला माणूस बनवण्यासाठी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी संघर्ष केला. म्हणूनच कोणताही धांगडधिंगा न करता केवळ महापुरुषांचे विचार समाजात रुजवत मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या एफ-उत्तरमधील सफाई कामगारांच्या सकाळपाळी कामगार संघटनेकडून अनोख्या पद्धतीने संयुक्त जयंती उत्सव साजरा करण्यात आला.Body:महात्मा फुले यांनी बहुजनांना शिक्षणाची दारं खुली करुन दिली. तर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा, असा संदेश दिला. तर सुशासनाची परंपरा मजबूत करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपले आयुष्य खर्च केले. डिजे लावून या तिन्ही महापुरुषांचीजयंती साजरी करण्यापेक्षा त्यांच्या विचारांचे आचरण करणे गरजेचे आहे. डिजे लावून जयंती साजरी करणे म्हणजे एकप्रकारे महामानवाच्या जयंतीचे विद्रुपीकरण आहे. या महापुरुषांचे विचार समाजात रुजवणे आवश्यक आहे. हा विचार करूनच मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या एफ-उत्तरमधील सफाई कामगारांच्या सकाळपाळी कामगार संघटनेकडून या संयुक्त जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. संघटनेचे अध्यक्ष अनिल सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली सामुदायिक बुद्धवंदनेने या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. त्यानंतर संघटनेचे चिटणीस प्रकाश जाधव यांनी सकाळपाळी कामगार संघटनेची प्रस्तावना उपस्थितांसमोर सादर केली.
त्यांनतर आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सभेत बहुजन महापुरुषांच्या जीवनावर अभ्यासपूर्ण व्याख्याने आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम पार पडले. यावेळी मुख्य प्रवक्ते विजय वाडवळ यांनी उपस्थित सफाई कामगारांशी संवाद साधून कामगारांचं प्रबोधन केलं. सफाई कामगार हे त्यांच्या कामाच्या स्वरूपामुळे दारूच्या आहारी जाताना दिसत आहेत, त्यामुळे सर्व कामगारांनी एकत्र येऊन दारू न पिता काम करण्याचा संकल्प करा, असा सल्ला यावेळी मुख्य प्रवक्ते विजय वाडवळ यांनी दिला. यावेळी माजी कमिटी सदस्यांचा आणि सफाई कामगारांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. अशाप्रकारचे प्रबोधन महोत्सव ठिकठिकाणी झाले पाहिजेत, अशी अपेक्षाही माजी अध्यक्ष विजय उघडे यांनी यावेळी व्यक्त केली. बापू जाधव यांनी आपल्या अनोख्या शैलीत या उत्सवाचे सूत्रसंचालन केलंConclusion:या उत्सवासाठी विनोद पेडणेकर, ऋषी, राजू,राजेश,वसंत,संतोष गर्जे,मनसुद भाई,विवेक कांबळे, रितेश सकपाळ, जितेंद्र कांबळे,हरी मानगेकर, या सर्व मंडळीच विशेष सहकार्य लाभले. यावेळी माजी सैनिक बाळू, सुशांत भोसले, किरण यादव, अभय सकपाळ, किरण धारिया, संतोष जाधव, कुंदन सोनवणे, मंगेश जाधव, मोहन पिसाळ, वैभव सकपाळ, राजू कांबळे या सर्व कार्यकर्त्यांनी हा उत्सव यशस्वी करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेतली.
Last Updated : May 5, 2019, 11:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.