ETV Bharat / state

नेतृत्व बदलावरून महाराष्ट्र काँग्रेसमध्ये धुमश्चक्री; आरोप, इशाऱ्यांमुळे गटबाजीला ऊत - Murli deora

पक्ष नेतृत्वासंदर्भात निर्णय घ्यावा, अशी मागणी करत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिल्यानंतर राज्यात काँग्रेसमधील नेत्यांमध्ये एकमेकांविरोधात आरोप, प्रत्यारोप सुरू झाले आहेत.‍

नेतृत्व बदलावरून महाराष्ट्र काँग्रेसमध्ये धुमश्चक्री; आरोप, इशाऱ्यांमुळे गटबाजीला ऊत

author img

By

Published : Aug 24, 2020, 3:25 PM IST

मुंबई - काँग्रेसच्या नेतृत्व बलदलावरून महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांमध्ये एकमेकांविरोधात धुमश्चक्री सुरू झाली आहे. इतकेच नव्हे तर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना राज्यात फिरू देणार नाही, अशा प्रकारे गंभीर इशारे देण्याचे प्रकार सुरू झाल्याने काँग्रेसमध्ये येत्या काही दिवसांत नेतृत्व बदलाच्या विषयावरून गटबाजीला ऊत येण्याची शक्यता आहे.

पक्ष नेतृत्वासंदर्भात निर्णय घ्यावा, अशी मागणी करत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिल्यानंतर राज्यात काँग्रेसमधील नेत्यांमध्ये एकमेकांविरोधात आरोप, प्रत्यारोप सुरू झाले आहेत.‍ सोनिया गांधी यांना जे पत्र लिहिण्यात आले, त्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ नेते मुकूल वासनिक, मुंबईचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा यांचा समावेश होता. या नेत्यांना थेट राज्यात कुठेही फिरू देणार नाही, असा गंभीर इशाराच मंत्री व काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी दिला आहे. जे पत्र लिहिले त्यासाठी या नेत्यांनी सोनिया गांधी यांची माफी मागण्याची मागणीही केदार यांनी केली. त्यामुळे राज्यात काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली असल्याचे दिसून आले आहे.

ज्या नेत्यांनी पत्र लिहिले त्यात राहुल गांधी यांना विरोध, पूर्णवेळ अध्यक्ष असावा, लोकांना आणि संघटनेलाही वेळ देणारा असावा अशी मागणी त्यात केली होती. मात्र, त्या मागणीलाच केदार यांच्यासह काँग्रेसच्या राज्यातील अनेक नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. काँग्रेसचे मुंबईचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांनी तर पत्र लिहिणाऱ्यांचे राहुल गांधी विरोधात षड्यंत्र असल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधी हे मागील काळात अध्यक्ष बनले होते. त्यावेळीही त्यांना अडचणीत आणण्याचे कारस्थान याच लोकांनी केला होते, असाही गंभीर आरोप निरूमप यांनी केला.

काँग्रेसचे नेतृत्व बदलावरून काँग्रेसच्या नेत्या व मंत्री यशोमती ठाकूर, मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासोबतच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राहुल गांधी यांनीच पक्षाची धुरा सांभाळावी, अशी मागणी केली आहे. दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडट्टीवार यांनी राहुल गांधी हेच काँग्रेसचे अध्यक्ष व्हावेत अशी मागणी केली. ते अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी जर राज्यात महाविकास आघाडीतून बाहेर पडा, असे म्हटले तर आम्ही सत्तेत एक मिनिटही राहणार नाही, असे विधान केले.

मुंबई प्रदेश काँग्रेसमध्ये मागील अनेक वर्षांपासून गटबाजी सुरू आहे. विशेषत: माजी प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम आणि मिलिंद देवरा यांच्यातील वाद अनेकदा चव्हाट्यावर आलेले असतानाच यावेळीही निरूपम यांनी नाव घेता मिलिंद देवरा यांच्यावर निशाणा साधला आहे. याच लोकांनी राहुल गांधी अध्यक्ष असताना षड्यंत्र केल्याचा आरोप केला. सोनिया गांधी यांना जे पत्र लिहिण्यात आले, त्यावर देवरा यांचीही सही आहे. यामुळे निरूपम यांनी यावरून देवरा यांना लक्ष्य केले आहे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.