मुंबई - दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार मिलींद देवरांनी प्रचारासाठी एक व्हिडीओ टि्वट केला होता. त्यात मुकेश अंबानी हे मिलींद देवरा यांच्यासाठी प्रचार करताना दिसत आहेत. मात्र या व्हिडिओशी काँग्रेसचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी व्यक्त केले आहे.
प्रत्येक उमेदवाराला त्याचा प्रचार करण्याचा अधिकार आहे. मिंलिद देवरांनी वैयक्तीकरित्या प्रचारासाठी हा व्हिडिओ बनवला असेल. पण असा कोणताही व्हिडिओ काँग्रेस पक्षातर्फे बनवन्यात आला नाही. राज्यघटनेनुसार प्रत्येकाला आपला प्रचार करण्याचा अधिकार आहे. परंतु पक्ष म्हणून या व्हिडीओशी आमचा कसलाही संबंध नसल्याचा पुनरुच्चार सिंघवींनी केला आहे.