ETV Bharat / state

CID Investigate in Threat Case : जितेंद्र आव्हाड कुटुंबियांच्या धमकी प्रकरणात उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिली 'ही' माहिती - धमकी

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांना धमकी दिल्याप्रकरणात सीआयडी चौकशी करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली आहे. तसेच त्यांच्या मुलीला देखील संरक्षण मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

CID Investigate in Threat Case
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Mar 17, 2023, 4:11 PM IST

मुंबई : माजी गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना धमकी देण्यात आल्याची घटना गेल्या महिन्यात समोर आली होती. आमदार जितेंद्र आव्हाडांची मुलगी नताशा आणि जावयावर गोळी झाडण्याची धमकी देण्यात आली होती, या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. तसेच आव्हाड यांच्या कुटुंब आणि मुलीला संरक्षण देणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

सभागृहात मुद्दा उपस्थित : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ठाण्यातील मनपाच्या अधिकाऱ्याकडून विधानसभेचे सदस्य असलेल्या आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीचा मुद्दा विशेष बाब म्हणून उपस्थित केला. संबंधित ठाणे मनपाच्या अधिकारी उघडपणे धमकी देणाऱ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभय मिळत असल्याचे समजते. एका आमदाराला धमकी आल्यानंतर त्यावर कारवाई ऐवजी सुरक्षा कवच देणे, ही बाब योग्य नाही. संबंधित त्या अधिकाराच्या मालमत्तेची चौकशी करावी, अशी मागणी देखील दानवे यांनी सभागृहात केली.

सीआयडी चौकशीचे आदेश : राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. ही बाब अतिशय गंभीर असून निषेधार्ह आहे. या प्रकरणात त्या अधिकाऱ्याची स्थानिक पोलिसांशी ओळख असल्याने सीआयडी अधिकारी देऊन त्याची चौकशी केली जाईल. तसेच एक ऑडिओ सीडी तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवली आहे. त्याचा अहवाल आला की कारवाई करू, असे आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिले. आव्हाड प्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असा दावा केला.

प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश : उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी, राज्यात लोकप्रतिनिधींना येणाऱ्या धमक्यांची बाब गृहमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच आव्हाड प्रकरणाची चौकशी होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, असे आदेश उपसभापती गोऱ्हे यांनी दिले.

काय आहे धमकी प्रकरण : ठाणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना मुलीला आणि जावयाला जीवे मारण्याची सुपारी दिल्याचे प्रकरण चांगलेच तापले आहे. आव्हाड्यांच्या समर्थकांनी मनपा मुख्यालयाच्या गेटवर आहेर यांची धुलाई केली. याप्रकरणी आव्हाड यांच्यासह सात कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हा वाद तापला असतानाच सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांची धमकी दिल्याची व्हिडिओ क्लिप समोर आली. त्यानंतर पत्नी ऋता आणि मुलगी नताशा आव्हाड यांनी जीवाला धोका असल्याची तक्रार ठाणे पोलीस ठाण्यात नोंदवली होती. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला आहे.

हेही वाचा : Eknath Shinde on Farmers Help : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रसंगी निकष डावलून मदत - मुख्यमंत्री

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.