ETV Bharat / state

चुनाभट्टी बलात्कार प्रकरणी राष्ट्रवादीचा पोलीस ठाण्यावर मोर्चा - सुप्रिया सुळे मोर्चा

मुंबईतील चुनाभट्टी पोलीस स्टेशन परिसरात दोन महिन्यांपूर्वी जालन्यातील एका युवतीवर 4 नराधमांनी बलात्कार केला, त्या तरूणीची मृत्यू सोबतची झुंज अखेर गुरूवारी संपली. यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली. शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चुनाभट्टी पोलीस ठाण्यावर युवतीला न्याय मिळावा यासाठी निषेध मोर्चा काढला.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात चुनाभट्टी पोलीस स्टेशनवर निषेध मोर्चा
author img

By

Published : Aug 30, 2019, 1:37 PM IST

मुंबई - दोन महिन्यापूर्वी चुनाभट्टी येथे बलात्कार झालेल्या तरूणीची मृत्यू सोबतची झुंज अखेर गुरूवारी संपली. यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. राष्ट्रवादी पक्षाने आज (शुक्रवार) चुनाभट्टी पोलीस ठाण्यावर युवतीला न्याय मिळावा आणि नराधमांना पकडण्यात यावे यासाठी मोर्चा काढला होता.

चुनाभट्टी बलात्कार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पोलीस ठाण्यावर मोर्चा

पीडित तरुणीला न्याय मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आज (शुक्रवारी) छगन पेट्रोल पंप (लाल डोंगर) ते चुनाभट्टी पोलीस स्टेशनवर निषेध मोर्चाचा काढला होता. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच सर्वसामान्य जनतेनेही यात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

हेही वाचा... चेंबूर येथे बलात्कार झालेल्या जालन्याच्या 'त्या' पीडितेचा मृत्यू

हेही वाचा... एक महिना मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 'तिचा' मृत्यू; मात्र आरोपी अद्याप मोकाटच

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले, तर आमदार विद्या चव्हाण, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नवाब मलिक हेही या मोर्चात सहभागी झाले होते. सुप्रिया सुळे यांनी सरकारच्या निष्क्रियतेमुळे राज्यात व मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारी वाढलेली असून सरकार कमळ फुलवण्याचा मग्न आहे. हे सरकार सामान्य माणसाचाला न्याय देणारे नसून अन्याय करणारे आहे, अशी टिका केली.

हेही वाचा... मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेली अन् चार नराधमांची शिकार झाली; जालन्याच्या तरुणीवर मुंबईत अत्याचार​​​​​​​

पीडित तरुणीला न्याय मिळाला नाही, तर मुंबईसह राज्यभर तीव्र आंदोलन करू - राष्ट्रवादी​​​​​​​

अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ जळगावात 'जनआक्रोश'​​​​​​​

Intro:चुनाभट्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोर्चाला सुरुवातBody:चुनाभट्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोर्चाला सुरुवात

चुनाभट्टी येथील पीडित तरुणीच्या यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने छगन पेट्रोल पंप लाल डोंगर ते चुनाभट्टी पोलीस स्टेशनवर निषेध मोर्चाचे आयोजन केले होते निषेध मोर्चाला सुरुवात झालेली आहे या निषेध मोर्चामध्ये मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आमदार विद्या चव्हाण मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नवाब मलिक सहभागी झाले आहेत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारच्या निष्क्रियतेमुळे राज्यात व मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारी वाढलेली आहेत सरकार कमळ फुलवण्याचा मग्न आहे हे सरकार सामान्य माणसाचा न्याय देणाऱ्या नसून अन्य करणार आहे असं करणार आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्याConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.