मुंबई - सिगरेट, दारू, तंबाखू सारख्या पदार्थामुळे तरुणाईचे आयुष्य उद्धवस्त होत आहे. या तरुणाईला बाहेर काढण्यासाठी प्रेमासारखा दुसरा पर्याय नाही. यामुळे गुरूवारी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे 'जोडीदार मज निर्व्यसनी हवा' हा संदेश घेऊन व्यसनमुक्तीचा प्रचार करण्यात आला. या उपक्रमात सिद्धार्थ महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी वधू आणि वर वेषभूषेत आले होते.
नशा ही आरोग्यास घातक आहे. किती घातक आहे हे समजून सांगत होते व जोडीदार निवडताना याचा विचार करा, असे यावेळी सांगण्यात आले. व्यसनाधीनतेकडे वाढत चाललेली युवकांची वाढती वाटचाल थांबवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. प्रेम करा. मात्र, जोडीदार व्यवस्थित निवडा हा संदेश देत आहोत जर जोडीदार व्यसनी असला तर संसार नीट चालू शकणार नाही. मुले होताना समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे आम्ही हा संदेश देत आहोत, असे नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
हेही वाचा - काय आहे ज्येष्ठ नागरिकांच्या प्रेमाची परिभाषा?