मुंबई - ब्रूक्स फार्मा कंपनी रेमडेसिवीर साठा प्रकरणी भाजप नेते प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. आम्ही सात दिवसांपूर्वी दमणला गेलो होतो. ते रेमडेसिवीर आम्ही राज्यसरकारला देणार होतो. त्याचे पैसे देवेंद्र फडणवीस देणार होते, अशी माहिती प्रसाद लाड यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री कट्टी-बट्टीचा डाव खेळत आहेत -
प्रवीण दरेकर यांनी त्या संदर्भात पत्रदेखील लिहिले होते. आम्ही मुख्य आयुक्त सिताराम कुंटे यांच्याशीदेखील फोनवरून चर्चा केली होती. सरकारने परवानगी दिलेल्या यादीत ब्रुक्स फार्मा या कंपनीचे नाव असल्याचे स्पष्टीकरण प्रसाद लाड यांनी आज पत्रकार परिषदेत दिले. तसचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कट्टी-बट्टीचा डाव खेळत आहेत. राजेंद्र शिंगणे यांचे ओएसडी ब्रूक्स फार्मा कंपनीच्या मालकाला धमकी देतात. असा आरोपही लाड यांनी पत्रकार परिषदेत केला.
गृहामंत्र्यांनादेखील इशारा -
ब्रुक्स फार्म कंपनीच्या मालकाला पोलिसांनी चौकशीसाठी बोलवले होते. यादसंदर्भात बोलताना गृहमंत्र्यांनी फडणवीस आणि दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल होणार असल्याचे म्हटले होते. परंतु या सगळ्याचे पुरावे अगोदर गृहमंत्र्यांनी द्यावे, त्यानंतरच गुन्हा दाखल करावा, असेही लाड यांनी म्हटले. तसेच जनतेच्या हिताकरिता एक काय, आम्ही दहा गुन्हे अंगावरती घेऊ, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.
हेही वाचा- दुरुस्तीसाठी वीजेच्या खांबावर चढला..अन् क्षणात खाली कोसळला..पाहा व्हिडिओ..