ETV Bharat / state

C M Uddhav Thackeray : विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर ; माझ्यावर झालेल्या टीकेला मी शांतपणे घेतो - मुंबई महानगरपालिका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ( Chief Minister Uddhav Thackeray ) प्रकृती ठिक नसल्यामुळे शासकीय कार्यक्रमांत अनुपस्थिती असते. त्यामुळे विरोधकांनी या मुद्द्यावरुन अनेक वेळा टीका केली. यावर आता मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

CM Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
author img

By

Published : Jan 5, 2022, 12:45 PM IST

मुंबई : 'माझ्यावर झालेल्या टीकेला मी शांतपणे घेतो. ज्या कोणाला दाखवायचा आहे, त्याला वेळी आल्यावर मी दाखवून ही देतो'. असा पलटवार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. काल रात्री मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या ( Mumbai Municipal Corporation ) पार्श्वभूमीवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत शिवसेना नेते आणि नगरसेवक यांच्याशी बोलताना त्यांनी विरोधकांवर हा पलटवार केला आहे. याबाबतची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. गेले काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांची शासकीय कार्यक्रमांमध्ये अनुपस्थिती पाहायला मिळते. या मुद्द्यांवरून विरोधक मुख्यमंत्र्यांवर गेल्या काही दिवसापासून टीका करत आहेत. त्या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी या बैठकीच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.

मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली. या बैठकीमध्ये नगरसेवक, आमदार आणि खासदार यांची ऑनलाईन बैठक पार पडली. ही बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलवली ( Online meeting of CMs ) होती. गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून जी टीका मुख्यमंत्र्यांवर होत आहे. त्या टीकेचा समाचार मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत घेतला आहे. 'माझ्यावर गेले काही दिवस वैयक्तिक टीका केली जातेय. मात्र मी मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर बसलो आहे. त्यामुळे या सर्व टीका शांतपणे घेत आहे. ज्यांना कोणाला दाखवायचे असेल त्यांना वेळ आल्यावर मी दाखवून देतो. त्यामुळे आता तुम्ही निवडणुकीच्या कामाला लागा. जनतेची कामं करा जनतेपर्यंत पोहोचा. मुंबईतील पाचशे स्क्वेअर फुट घराचा कर माफीचा निर्णय आपण घेतला आहे. तो निर्णय जनतेपर्यंत पोहोचवा' अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीतून आपल्या नेत्यांना आणि नगरसेवकांना दिल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.