मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर (border disputes) पुन्हा एकदा वाद उफाळून आला आहे. कर्नाटकच्या कन्नड रक्षण वेदिका या संघटनेकडून मराठी भाषिकांच्या गाड्या तोडफोड करण्यात येत आहेत. एस टी ची तोडफोड करण्यात येत आहे. या संदर्भात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Karnataka CM Basavaraj Bommai) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी आपण दूरध्वनीवरून चर्चा केली आहे. दोघांनाही या घटनेचे गांभीर्य (confirmed action On vandals) सांगितले आहे, असे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) म्हणाले.
शांतता राखण्याचे आवाहन : दरम्यान महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद हा न्यायालयात प्रलंबित असून; जोपर्यंत न्यायालय निर्णय देत नाही. तोपर्यंत दोन्ही बाजूच्या नागरिकांनी शांतता पाळायला हवी. या संदर्भात आपण निर्देश द्यावे अशी विनंती, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना केली आहे. त्यांनी ती मान्य केली आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
उपमुख्यमंत्र्यांचेही प्रयत्न यशस्वी : कर्नाटक मधील संघटना कन्नड रक्षण वेदिकेच्या हिंसक कारवाया वाढल्या असून; हिरेबाग वाडी परिसरात गाड्या फोडण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाने पुन्हा एकदा उग्ररूप धारण केले आहे. कर्नाटकातील ही संघटना आक्रमकपणे हिंसक कारवाया करत आहे. या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच यासंदर्भात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे दूरध्वनीवरून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. दरम्यान,कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनांमध्ये लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले. महाराष्ट्रातून येणार्या वाहनांना संरक्षण दिले जाईल, असेही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणात आश्वस्त केले होते.