मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात आज विविध बैठकांचे नियोजन केले होते. मात्र, अचानक या बैठका पुढे ढकलण्यात (CM has suddenly postponed all meetings today) आल्या आहेत. मुख्यमंत्री सचिवालय विभागाकडून यासंदर्भातील माहिती (informed Chief Ministers Secretariat Department) देण्यात आली. आजच्या या बैठकांमध्ये अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार होती.
महाराष्ट्र माजी सैनिक आणि जिल्हा सैनिकांच्या विविध अडचणी आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी या पार्श्वभूमीवर महाराष्ट माजी सैनिक महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण बैठक आणि जिल्हा सैनिक बोर्ड यांच्या इतर विषयासंदर्भात दुपारी एक वाजता मंत्रालयात बैठक बोलावली होती. तर दुपारी अडीच वाजता दहेज - नागोठाणे इथेन गॅस पाईप लाईन प्रकल्पांतर्गत बाधित झाल्याबाबत बैठक बोलावली होती. पेण अर्बन बॅंक ठेवीदार व खातेदार संघर्ष समिती यांच्या मागण्यांबाबत बैठक बोलावली होती. प्रशासकीय अधिकाऱ्यांना तशा सूचना देखील देण्यात आल्या होत्या. परंतु, अचानक या बैठका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या बैठका रद्द करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.