ETV Bharat / state

Vidya Chavan Criticizes Nitesh Rane : दीड फुटाचा आमदार तीन फुटांची जीभ असल्यासारखं बोलतो - विद्या चव्हाण - Vidya Chavan criticizes Shinde Fadnavis government

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण ( Vidya Chavan women state president of NCP ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांच्यावर टीका केली आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस केवळ रबर स्टॅम्प आहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ), अमित शहांच्या ( Amit Shah ) पुढे बोलू शकत नाही असे त्या म्हणाल्या.

Vidya Chavan Criticizes Nitesh Rane
दीड फुटाचा आमदार तीन फुटांची जीभ असल्यासारखं बोलतो - विद्या चव्हाण
author img

By

Published : Jan 8, 2023, 4:03 PM IST

विद्या चव्हाण यांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

नवी मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) हे केवळ रबर स्टॅम्प आहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ), अमित शहांच्या ( Amit Shah ) पुढे ते बोलू शकत नाहीत अशी खोचक टीका राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण ( Vidya Chavan women state president of NCP ) यांनी केली आहे. समृद्धी महामार्गाच्या उदघाट्न प्रसंगी मोदी आले असता शिंदे फडणवीस ( Vidya Chavan Criticizes Shinde Government ) बेळगाव प्रश्नावर का बोलले नाही? आमच्या महाराष्ट्राचे चार तुकडे होऊ देऊ नका अशी विनंती देखील त्यांनी केली.

नितेश राणेला म्हणाल्या तीन फुटाचा आमदार - बेळगावातील मराठी माणसांना न्याय द्या. शिंदे फडणवीसांच्या पाठीवरून मोदींनी हाथ फिरवला की, ते एकदम नमून गेले असे देखील चव्हाण म्हणाल्या. विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी महिला आघाडीची सध्या महागाईविरोधात जनजागर यात्रा सुरू आहे. या यात्रेदरम्यान नवी मुंबईत आल्या असता त्या पत्रकारांशी बोलत होत्या. दरम्यान चव्हाण यांनी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी ‘दीड फुटाचा आमदार तीन फुटांची जीभ असल्यासारखं बोलतो. अजित पवारांवर बोलण्याआधी तुम्ही कोण आहात, याचा विचार करा,’ असे चव्हाण म्हणाल्या.

संभाजी महाराज धर्मवीर स्वराज्य रक्षक - छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नाहीत तर, स्वराज्य रक्षक आहेत,असं वक्तव्य अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये केले होते. अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर भाजप चांगलीच आक्रमक झाली. त्यांनी राज्यात ठिकठिकाणी याबाबत आंदोलने केली. यावेळी आमदार नितेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर टीका करताना त्यांचा उल्लेख धरणवीर असा केला. त्यांच्या या टीकेला अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तरसुद्धा दिले होते.

बेरोजगारी वरील लक्ष हटवण्यासाठी भाजप भाजपचा डाव - महागाई, बेरोजगारी वरील लक्ष हटवण्यासाठी भाजप अनावश्यक विषय घेत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. तुम्ही ‘कामाख्या देवीकडे जाऊन जादू टोणा करून सत्ता आणली पण, ती टिकणार नाही. आमच्याकडे साडेतीन शक्तीपीठं आहेत. तुम्ही कामाख्या देवीला जाता, कारण तिकडे जादूटोणा चालतो म्हणून, असे म्हणत चव्हाण यांनी शिंदे फडणवीस सरकारची लक्तरे वेशीवर टांगली.

भाजपचे हिंदुत्व ढोंगी - भाजपचे हिंदुत्व हे ढोंगी हिंदुत्व आहे. प्रज्ञा ठाकूर, कालिचरण हे भगवे वस्त्रधारी गुंड असल्याचा आरोप त्यांनी केला. मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी शिक्षा भोगलेली प्रज्ञा ठाकूर खासदार बनते. भगवे वस्त्र घालत भाजप जनतेची दिशाभूल करीत असल्याचे चव्हाण म्हणाल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.