मुंबई - शाहरुख खान यांचा पठाण हा नवा चित्रपट येतो आहे. या चित्रपटातील एका गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोण भगव्या रंगाच्या ड्रेसमध्ये दाखवण्यात आली आहे. दरम्यान, यामधील भगव्या रंगावर प्रेक्षक वर्गासह राजकीय, सामाजिक आणि मनोरंजन क्षेत्रातूनही आक्षेप घेण्यात आला आहे. याबाबतच राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, जर आक्षेप घेतला जात असेल, आणि या प्रकारामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या जात असतील तर चित्रपटावर अथवा, गाण्यावर बंदी घाल घालण्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निर्णय घेतील अस ते म्हणाले आहेत.
दृश्यावर जोरदार आक्षेप - अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा समावेश असलेला पठाण हा चित्रपट आता वादग्रस्त ठरू लागला आहे. या चित्रपटातील एका गाण्यामध्ये दीपिका पदुकोन हिने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटना आणि सनातनवाद्यांनी या गाण्यावर आणि दृश्यावर जोरदार आक्षेप नोंदवला आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील - या संदर्भात राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की शाहरुख खानच्या सिनेमा जर भगव्या रंगाची बिकिनी वापरून बेशरम रंग असा उल्लेख केला गेला असेल तर तो निश्चितच योग्य नाही. कोणत्याही धर्माच्या भावना दुखावल्या जाव्यात अशा पद्धतीच्या कोणत्याही गोष्टीचे चित्रीकरण केले जाऊ नये या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निश्चितच निर्णय घेतील, तसेच, जर काही आक्षेपार्ह असेल तर गीतावर अथवा चित्रपटावर बंदी आणण्यासंदर्भात ते निर्णय घेतील असे मत सत्तार यांनी व्यक्त केले आहे.
काय आहेत प्रकरण - शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांचा पठाण या चित्रपटाचे बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. काहींना दीपिकाचे कपडे आवडले नाहीतर काहींना तिचे हावभाव आवडले नाहीत. तसेच, यामध्ये दीपिका पादुकोण हिने केशरी रंगाची बिकिनी घातल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, यावर मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी गाण्यात वापरण्यात आलेली वेशभूषा अत्यंत आक्षेपार्ह नक्कीच आहे. भ्रष्ट मानसिकतेमुळे हे गाणे चित्रित करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे असही ते म्हणाले आहेत.