ETV Bharat / state

Shiv Jayanti Celebration : राज्यात शिवजयंती उत्साहात; BMC निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपचा खास 'वॉर्ड आरती' उपक्रम - Shivaji Maharaj birth anniversary celebrated

भाजपकडून आज शिवजयंती मोठ्या उत्साहात राज्यभर साजरी करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने संधीचा पुरेपूर फायदा घेत शिवजयंती साजरी केली. मुंबई भाजपातर्फे आज मुंबई महानगरपालिकेचे २२७ वॉर्ड, इतरत्र अशा जवळपास ४०० पेक्षा अधिक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

Shiv Jayanti Celebrated
Shiv Jayanti Celebrated
author img

By

Published : Feb 19, 2023, 10:26 PM IST

Updated : Feb 19, 2023, 10:49 PM IST

राज्यात शिवजयंती उत्साहात

मुंबई : भाजपकडून आज शिवजयंती मोठ्या उत्साहात मुंबईभर साजरी करण्यात आली. कुठे चौकात ढोल ताशांचा गजर, दांडपट्टा, कुठे शिवकालीन नाण्यांचे, शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन, पोवाडे, तुतारी, भव्य मिरवणूका आणि 'जय जय शिवराय' या आरतीचा जयघोष. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवराय अशा घोषणांमध्ये अवघी मुंबई आज दुमदुमून गेली होती. विशेष म्हणजे कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये आज शिवजयंती साजरी करण्यात आली.

उत्सवांचा धुमधडाका : राज्यात नाट्यमय सत्तांतर झाल्यानंतर शिंदे - फडणवीस सरकार अस्तित्वात आले व या सरकारने मागील दोन वर्षापासून सण उत्सवांवर असलेली सर्वच बंधन पूर्णतः दूर केली. दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र, नवीन वर्षाच्या जल्लोषा पाठोपाठ आता छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुद्धा धुमधडाक्यात साजरी केली गेली.

२२७ वॉर्ड भाजपने केली जयंती : मुंबई महानगरपालिकेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. मुंबई भाजपातर्फे आज मुंबईत महानगरपालिकेचे २२७ वॉर्ड व इतरत्र अशा जवळपास ४०० पेक्षा अधिक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. शहरात या निमित्ताने काढण्यात आलेल्या शोभायात्रा, मिरवणूका, भगव्या पताका, होर्डिंग, देखावे यामुळे मुंबईत आजचा दिवस छत्रपतींंच्या जयघोषात निनादून गेला होता.

मुंबईभर विविध स्पर्धा, प्रदर्शन : मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी आज मुंबईत अनेक ठिकाणच्या जयंती उत्सवांना भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. मुंबईत शिवजयंती निमित्त भाजपा मुंबईच्या वतीने अभिवादन करणारे ५० हून अधिक भव्य डिजिटल बॅनर लावण्यात आले होते. मुंबईभर भव्य मिरवणूका काढण्यात आल्या. विविध ठिकाणी चित्रकला, किल्ले बांधणी अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. काही ठिकाणी शिवकालीन नाण्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. तर काही ठिकाणी शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.

शिवजयंतीसाठी पुन्हा वरळी : शिवसेना युवा नेते व तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा व शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या वरळी मतदारसंघावर भाजपने जोरदार लक्ष दिले आहे. दहीहंडी, नवरात्र उत्सव पाठोपाठ आता भाजपने इथे शिवजयंतीही मोठ्या उत्साहात साजरी केली. वरळीला नाक्यावर भव्य शिव प्रतिमा उभारुन पोवाडा, लेझीम, ढोल पथकांसह ५० कलावंतांनी महाराष्ट्राच्या लोकधारेतील सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. तर आमदार आशिष शेलार यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकर यांनी शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या आरतीचा जयघोष वरळी परिसरामध्ये दुमदुमला होता.

बुलढाण्यात शिवजयंती निमित्य भव्य शोभायात्रा

बुलडाणा : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आजोळात बुलडाणा जिल्ह्यात हा उत्सव लोकउत्सव म्हणून साजरा केला जात आहे. सकाळी पारंपरिक पद्धतीने जन्मोत्सव सोहळा साजरा केल्यानंतर सायंकाळी ढोल ताशाच्या निनादात टाळ मृदुंगाच्या गजरात,जय भवानी, शिवराय च्या घोषणा देत बुलडाण्यात शोभायात्रा काढण्यात आली.

विविध वेशभूषा : लेझीम पथक , भजनी मंडळ , शिवचरीत्रावरील विविध देखावे ,घोड्यावरस्वार छत्रपती शिवाजी महाराज , राजमाता जिजाऊ , संभाजी महाराज, सोबतीला मावळे यांच्या वेशभूषा साकारण्यात आल्या होत्या . शिवाय युवकांनी या शोभायात्रेत चित्तथरारक प्रात्येशिके सादर केली. लेझीम पथकातील महिलांनी अस्सल मराठमोळी पेहराव परिधान केला होता, तर महिला हि जिजाऊच्या भावावस्थेत या शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या .

शिवरायांना मानवंदना : बुलडाणा येथे सर्व जातिधर्मांच्या वतीने शिव जन्मोत्सव सोहळा लोकोत्सव म्हणून साजरा करण्यात आला. यावर्षी सार्वजानिक जयंती उत्सवानिमितीच्या वतीने सकाळी 9 वाजता जिजाऊ प्रेक्षकांवर वंदन परिक्रमा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये बाल शिवाजी जिजाऊ यांची वेशभूषा प्रदान करून महीला, पुरूष सहभागी झाले होते जिजाऊ वंदनाने कार्यकमाला सुरुवात झाली. त्यानंतर महिलांच्यावतीने बाल शिवाजी ना पाळ्ण्यात टाकून, पाळणा गीत गाऊन जन्मोत्सव सोहळा पारंपारिक पद्धतीने साजरा केला गेला. यावेळी छोटी शिवबा, राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या वेशभूषा साकारलेले बालक बालिका यांनी शिवरायांना मानवंदना दिली.

यवतमाळात ‘जय जिजाऊ, जय शिवराय’चा जयघोष

यवतमाळ : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविवारी यवतमाळ शहरासह जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवरायांना मानाचा मुजरा करण्यासाठी येथील शिवतीर्थावर शिवप्रेमींचा मोठा सागर उसळला होता. अवघ्ये यवतमाळ भगवेमय पहायला मिळाले. सायंकाळी शहरातून निघालेली शोभायात्रा लक्षवेधी ठरली. ‘जय जिजाऊ, जय शिवराय’च्या जयघोषाने यवतमाळ दुमदुमले होते.

शिवतीर्थावर विविध कार्यक्रमांचे आयोजन : यवतमाळ येथील सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त छत्रपती महोत्सवाचे आयोजन 17 ते 24 फेब्रुवारी दरम्यान शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर येथे करण्यात आले. 19 फेब्रुवारीला शिवरायांच्या जयंतीदिनी शिवतीर्थावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सकाळपासूनच शिवतीर्थावर छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करण्यासाठी शिवपेमींनी गर्दी केली होती. चित्रकला स्पर्धा, रक्तदान शिबिर आदी कार्यक्रम घेण्यात आले. तसेच शहरातून मोटार सायकल रॅली काढण्यात आली. यामध्ये महिला, पुरुष, तरुण, तरुणींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. तसेच सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची शोभायात्रा काढण्यात आली.

शोभायात्रेत विविध झाँकी : विविध मार्गाने मार्गक्रमण करीत निघालेल्या या शोभायात्रेत विविध झाँकी होत्या. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, बाल शिवाजी, माँ जिजाऊ, मावळे आदी वेशभूषा परिधान करण्यात आली होती. तसेच पारंपारिक खेळाचेही प्रदर्शन करण्यात आले. भजनी मंडळाचाही शोभायात्रेत समावेश होता. ढोल ताशा पथक, बॅण्ड, डीजे आदी वाद्याच्या गजरात ही शोभायात्रा निघाली. ‘जय जिजाऊ, जय शिवराय’च्या जयघोषाने यवतमाळ शहर दुमदुमले होते. शोभायात्रेसह विविध कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

हेही वाचा - Uddhav thackeray on Amit Shah : निवडणूक आयोगाच्या निकालानंतर 'मोगॅम्बो खूश हुआ', उद्धव ठाकरेंची खोचक टीका, तर शाह म्हणाले...

Last Updated : Feb 19, 2023, 10:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.