ETV Bharat / state

Chhatrapati Sambhajiraje : संभाजीराजे यांचे कोल्हापुरात जल्लोषात स्वागत; शाही लवाजम्यासह मिरवणूक काढत हत्तीवरून साखर-पेढे वाटले

author img

By

Published : Mar 11, 2022, 11:48 AM IST

Updated : Mar 11, 2022, 12:54 PM IST

मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती २६ फेब्रुवारी रोजी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषणास बसत सरकारकडून सर्व मागण्या मान्य करून घेतल्या आहेत. यानंतर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनकडून कोल्हापुरात साखर वाटप करत जल्लोष देखील साजरी करण्यात आले.

Chhatrapati Sambhajiraje
संभाजीराजे

कोल्हापूर - मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी खासदार छत्रपती संभाजीराजे २६ फेब्रुवारी रोजी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषणास बसत सरकारकडून सर्व मागण्या मान्य करून घेतल्या आहेत. यानंतर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून कोल्हापुरात साखर वाटप करत जल्लोषदेखील साजरी करण्यात आले. मात्र, या मुंबईत झालेल्या उपोषणानंतर संभाजीराजे आज दि.१० मार्च रोजी पहिल्यांदाच कोल्हापुरात दाखल झाले. यामुळे मराठा समजाच्या वतीने त्यांचे जोरदार जल्लोष करत स्वागत करण्यात आले तसेच असून हत्तीवरून साखर पेढे वाटत मिरवणूक काढण्यात आले तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.

संभाजीराजे यांचे कोल्हापुरात जल्लोषात स्वागत

कोल्हापूरच्या परंपरेला साजेसे भव्य दिव्य स्वागत -

मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हा सध्या न्यायप्रविष्ट आहे. मात्र, समाजाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी तसेच राज्य सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या प्रलंबित मागण्या पूर्ण होण्यासाठी संभाजीराजे हे २६ फेब्रुवारी रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत उपोषणास बसले होते. उपोषण चालू झाल्यानंतर सरकारने या उपोषणाची तत्काळ दखल घेत तीन दिवसातच राज्य सरकारने त्यांच्या सर्व ७ मागण्या मान्य करत तत्काळ अंमलबजावणी करण्याचे लेखी पत्र दिले. यानंतर संभाजीराजे यांनी हे उपोषण थांबवले. हा समाजासाठी एक मोठा विजय आहे. यामुळे समाजातील घटकांना मोठा लाभ मिळणार आहे. तर या उपोषणानंतर संभाजीराजे छत्रपती हे आज रोजी संध्याकाळी ६ वाजता पहिल्यांदाच कोल्हापुरात दाखल झाले.

यावेळी संभाजीराजे छत्रपती यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांचे स्वागत हे कोल्हापूरच्या परंपरेला साजेसे भव्य दिव्य प्रमाणात करण्यात आले. यावेळी छत्रपती घराण्या विषयी असणारी कृतज्ञता कोल्हापूरकर व्यक्त करत ढोल ताशा च्या गजरात आणि चित्तथरारक मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके दाखवत तसेच वारकरी बंधूंचे टाळ, मृदुंग आणि धनगरांच्या ढोल च्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले आणि मिरवणूकदेखील काढण्यात आली. ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भवानी मंडप पर्यंत काढण्यात आली या वेळी असंख्य मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा - Sanjay Raut : अन्यायाविरोधात आवाज उठवण म्हणजे तपास यंत्रणांवर दबाव होत नाही -राऊत

• असे झाले संभाजीराजे छत्रपती यांचे स्वागत -

छत्रपती संभाजीराजे हे आज कोल्हापुरात दाखल होताच त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मुख्य मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. यामध्ये सुरुवातीला हत्तीवर स्वराज्याचा जरीपटका असलेला मावळा, त्यानंतर अश्व व त्यावर पारंपारीक वेशातील मावळे व महिला आरूढ होते. तसेच कोल्हापुरातील वाद्यपथके, चित्तथरारक मर्दानी खेळ खेळणारे आखाडे, धनगरी ढोल, वारकरी पथक, लेझीम पथक, तुतारी, झांजपथक सहभागी झाले होते.

याअगोदर त्यांनी कोल्हापुरात दाखल होताच रुईकर काॅलनी येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले तसेच करवीर संस्थापिका रणरागिणी महाराणी ताराबाई साहेब, व्हिनस काँर्नर येथील छत्रपती राजाराम महाराज, दसरा चौकातील राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन महाराजांना अभिवादन करत बिंदू चौकातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर त्यांचा मुख्य मिरवणूकीला प्रारंभ करण्यात आला.

Last Updated : Mar 11, 2022, 12:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.