ETV Bharat / state

Charge Sheet Against Salim Fruit : डी कंपनी टेरर फंडिंग प्रकरणात सलीम फ्रुटसह इतर दोन आरोपींच्या विरोधात मुंबई सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल - Charge Sheet Against Salim Fruit

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या अनधिकृत कामाला पैसे पुरवण्याच्या आरोपाखाली मे महिन्यात अटक करण्यात आलेल्या आरोपी विरोधात मुंबई सत्र न्यायालयातील (Charge Sheet Against Salim Fruit) विशेष एनआयए कोर्टामध्ये आरोप पत्र दाखल (Charge sheet filed in special NIA court) करण्यात आले आहे. अनेक इलेक्ट्रॉनिक पुराव्यासह एक हजार पानाचे आरोपपत्र असल्याची माहिती मिळाली आहे. (Charge sheet filed in Mumbai Sessions Court), Latest news from Mumbai, Mumbai Crime

Charge Sheet Against Salim Fruit
सलीम फ्रुट
author img

By

Published : Nov 5, 2022, 9:08 PM IST

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या अनधिकृत कामाला पैसे पुरवण्याच्या आरोपाखाली मे महिन्यात अटक करण्यात आलेल्या आरोपी विरोधात मुंबई सत्र न्यायालयातील (Charge Sheet Against Salim Fruit) विशेष एनआयए कोर्टामध्ये आरोप पत्र दाखल (Charge sheet filed in special NIA court) करण्यात आले आहे. अनेक इलेक्ट्रॉनिक पुराव्यासह एक हजार पानाचे आरोपपत्र असल्याची माहिती मिळाली आहे. (Charge sheet filed in Mumbai Sessions Court), Latest news from Mumbai, Mumbai Crime

जमा रकमेचा वापर दहशतवादी कारवायांकरिता- राष्ट्रीय तपास यंत्रणेने मे महिन्यामध्ये महाराष्ट्रातसह मुंबई अनेक ठिकाणी छापेमारी केली होती. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या कारवायांना मुंबईतून पैसा पुरवण्यात येत असल्याच्या आरोपाखाली छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणात दाऊद इब्राहिमचा साथीदार छोटा राजनचा मेव्हणा सलीम फ्रुटला, आरिफ अबुबकर शेख आणि शब्बीर अबुबकर शेख यांना अटक करण्यात आले होते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम च्या दहशतवादी कारवायाकरिता मुंबईतून मोठ्या व्यवसायिकांकडून तसेच अनधिकृत फ्लॅट विक्रीच्या व्यवसायातून जमा केलेले रक्कम ही दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीला देण्यात येत असे. या पैशातून दाऊद इब्राहिम दहशतवादी कारवाया करण्यात उपयोग करत आहे असा दावा एनआयए केला होता या प्रकरणात आरोप पत्र दाखल करण्याकरिता एनआयएने नुसतेच 90 दिवसाची मुदतवाढ मागितली होती वाढीव मुदतवाढ देण्यात आल्यानंतर वेळेपूर्वीच आज आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

18 सदस्यांची चौकशी - एनआयएकडून छापेमारी करण्यात आली होती. छापेमारी दरम्यान एनआयएला अनेक महत्त्वाचे पुरावे सापडले. त्यानंतर 18 लोकांची एनआयएकडून सलग तिसऱ्या दिवशी देखील चौकशी करण्यात आली होती. गुरुवारी या प्रकरणात एनआयएकडून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. बेकायदेशीर कारवाया आणि दहशतवादी कारवाया साठी पैसे पुरवणे सहभाग होता असे एनआयएकडून सांगण्यात आले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने सोमवारी आणि मंगळवारी मुंबई परिसरात जवळपास 29 ठिकाणांवर छापे टाकले होते. हे सर्व छापे कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित व्यक्तींच्या मालमत्तांवर टाकण्यात आले होते. एनआयएने या सर्व व्यक्तींची झाडाझडती घेतली होती व त्यांची कसून चौकशी केली होती. यावेळी एनआयएने अनेक महत्त्वाचे पुरावेही जप्त केले होते. या प्रकरणी मुंबईतील एनआयए मुख्यालयात सुमारे 18 सदस्यांची चौकशी करण्यात आली आहे.

पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले - एनआयएकडून चौकशीच्या थेट तिसऱ्या दिवशी मुंबईतील एनआयए मुख्यालयात सुमारे 18 सदस्यांची चौकशी करण्यात आली. या सर्वांना आज पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. काही जणांना घरी सोडले तर काही जण अजूनही एनआयए ऑफिसलाच आहेत. 18 जणांमध्ये सलीम कुरेशी उर्फ ​​सलीम फ्रूट, माहीम आणि हाजी दर्ग्याचे व्यवस्थापकीय विश्वस्त सुहेल खंडवानी, अजय गोसालिया, गुड्डू पठाण, मुनाफ शेख, अस्लम पठाणी, समीर हिंगोरिया, कय्युम शेख, आरिफ शेख आदींचा समावेश आहे.

डी कंपनीची पाळेमुळे खणणार- दाऊद इब्राहीमशी संबंधित प्रकरणाचा तपास केंद्रीय गृह मंत्रालयाने फेब्रुवारी 2022 मध्ये एनआयएकडे सोपवला होता. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे डी कंपनी आणि दाऊद इब्राहीम भारतात टेरर फंडिंग, नार्को टेरर, ड्रग्ज स्मगलिंग आणि बनावट चलनाचा वापर करण्याचे काम करत आहे. दाऊद इब्राहीम आणि डी-कंपनी लश्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद आणि अल कायदा यांच्या माध्यमातून भारतात अतिरेकी कायवाया करत असल्याचंही गृह मंत्रालयाचं म्हणणं आहे. एनआयए फक्त दाऊद इब्राहीम आणि डी-कंपनीचीच चौकशी करणार नाहीये, तर छोटा शकील, जावेद चिकना, टायगर मेनन, इकबाल मिर्ची, दाऊदची बहीण हसीना पारकर यांच्याशी संबंधित घटनांचाही तपास करणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.