ETV Bharat / state

झाकीर नाईकच्या विरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल, १९३ कोटींची बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याचा आरोप

या अगोदर मुंबईतील झाकीर नाईक याच्या मालकीच्या ५ मालमत्तांवर जप्ती आणण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिले होते. झाकीर नाईक याच्या पीस टिवीवर बांगलादेश, भारतात प्रसारणावर बंदी असून श्रीलंकेत झालेल्या बॉम्ब ब्लास्ट नंतर तेथेही या वाहिनीच्या प्रसारणास बंदी घालण्यात आली आहे.

झाकीर नाईक
author img

By

Published : May 3, 2019, 7:44 AM IST

मुंबई- दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देत मुस्लिम तरुणांची माथी भडकवल्याचा आरोप असलेला व सध्या देशातून फरार होऊन मलेशियात लपलेल्या विवादित इस्लामिक धर्मप्रचारक डॉ. झाकीर नाईक याच्या विरोधात ईडीकडून पीएमएलए कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तब्बल १९३ कोटींची बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याचा आरोप यात करण्यात आला आहे.

या अगोदर मुंबईतील झाकीर नाईक याच्या मालकीच्या ५ मालमत्तांवर जप्ती आणण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिले होते. ज्यात मुंबईतील माझगाव परिसरातील क्रिस्टल रेसिडेन्सी इमारतीतील ३६० चौ. फुटांचा व्यावसायिक गाळा, जास्मिन इमारतीतील बी-१००५ आणि बी-१००६ हे दोन फ्लॅट, मारिया हाईट्स इमारतीतील १७०१ आणि १७०२ हे दोन फ्लॅट या संपत्तीचा समावेश आहे.

झाकीर नाईक याच्या पीस टिवी वर बांगलादेश, भारतात प्रसारणावर बंदी असून श्रीलंकेत झालेल्या बॉम्ब ब्लास्ट नंतर तेथेही या वाहिनीच्या प्रसारणास बंदी घालण्यात आली आहे. झाकीर नाईक याच्या आयआरएफ म्हणजेच इस्लामिक रिसर्च फाउंडेशन या संस्थेवर सुद्धा २०१६ साली केंद्र सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे.

Intro:दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देत मुस्लिम तरूणांची माथी भडकवल्याचा आरोप असलेला व सध्या देशातून फरार होऊन मलेशियात लपलेल्या विवादित इस्लामिक धर्मप्रचारक डॉ झाकीर नाईक याच्या विरोधात ईडी कडून लिएमएलए कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून तब्बल 193 कोटींची बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. Body:या आगोदर मुंबईतील झाकीर नाईक याच्या मालकीच्या 5 मालमत्तांवर जप्ती आणण्याची आदेश विशेष न्यायालयाने दिले होते. ज्यात मुंबईतील माझगाव परिसरातील

1) क्रिस्टल रेसिडेन्सी इमारतीतील र 360 चौ. फुटांचा व्यावसायिक गाळा,

2) जास्मिन इमारतीतील बी-1005 आणि बी-1006 हे दोन फ्लॅट

3)मारिया हाईट्स इमारतीतील 1701 आणि 1702 हे दोन फ्लॅट Conclusion:या संपत्तीचा समावेश आहे. झाकीर नाईक याच्या पीस टिवी वर बांगलादेश , भारतात प्रसारणार बंदी असून श्रीलंकेत झालेल्या बॉम्ब ब्लास्ट नंतर इथेही या वाहिनीच्या प्रसारणास बंदी घालण्यात आली आहे. झाकीर नाईक याच्या आयआरएफ म्हणजेच इस्लामिक रिसर्च फौंडेशन या संस्थेवर सुद्धा 2016 साली केंद्र सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.