ETV Bharat / state

Char Dham Yatra Fraud : चार धाम यात्रा कमी खर्चात पडली महागात; फरार ट्रॅव्हल एजंटला वर्षभरानं अटक

Char Dham Yatra Fraud: स्वस्त दरात चार धाम यात्रा करण्याच्या नावाखाली 33 प्रवाशांच्या समुहाला लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या एका ट्रॅव्हल एजंटला कांदिवली पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे अटक केली आहे. (Travel Agent Arrest) राजेश पटेल (53) असे या एजंटचे नाव आहे. त्याने मार्च, 2022 मध्ये हे कृत्य केले होते. त्यानंतर तो त्याच्या अन्य एका साथीदारासह फरार झाला होता. त्याला एका महिला शिक्षिकेच्या तक्रारीवरून 2 नोव्हेंबर, 2023 रोजी अटक केली गेली. (Financial Fraud in the Name of Travel)

Char Dham Yatra Fraud
ट्रॅव्हल एजंटला वर्षभराने अटक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 5, 2023, 3:59 PM IST

ट्रॅव्हल एजंट फसवणूक प्रकरणी पोलिसांची प्रतिक्रिया

मुंबई Char Dham Yatra Fraud : 33 प्रवाशांच्या समुहाला चार धाम यात्रेला कमी पैशात जाण्याचे आमिष दाखवून ट्रॅव्हल एजंटनी लाखो रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी 53 वर्षीय व्यक्तीला मुंबईतील कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे. त्याच व्यक्तीसह त्याच्या एका साथीदाराने बोरिवलीतही यात्रेच्या नावाखाली काही जणांची फसवणूक केली. याप्रकरणी कस्तुरबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पैसे घेतले आणि झाला फरार: गेल्या वर्षी 2022 मध्ये अटक करण्यात आलेल्या राजेश पटेल (53) याने कांदिवली पश्चिम येथे टूर अँड ट्रॅव्हल्सचे कार्यालय उघडले होते. त्याने बर्‍याच वृत्तपत्रांमध्ये स्वस्त दरात चारधाम ट्रॅव्हल पॅकेजची जाहिरात केली होती. ज्यात बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथधाम आणि रामेश्वरमचा समावेश होता. वाचल्यानंतर एक महिला शिक्षिका पटेल यांच्याकडे आली. तिथे पटेल यांनी 30 प्रवाशांचे पॅकेज 10 लाख 85 हजार रुपये ठरवले. महिला शिक्षिकेने प्रति प्रवासी 11 हजार रुपये घेतले आणि 22 मार्च 2022 रोजी अ‍ॅडव्हान्स म्हणून 30 हजार रुपये राजेश पटेल यांच्या कार्यालयात जमा केले. ती 17 एप्रिल 2022 रोजी पटेल यांच्या कार्यालयात गेली तेव्हा तेथील कार्यालय बंद होते. तिने पटेल यांच्या मोबाईल क्रमांकावर फोन केला; परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

गुप्त माहितीच्या आधारे ट्रॅव्हल एजंटला अटक : या महिला शिक्षिकेने कांदिवली पोलीस ठाणे गाठले. तेथे पोलिसांनी गुन्हा दाखल करून राजेश पटेलचा शोध सुरू केला. मात्र तो कुठेच सापडला नाही. 2 नोव्हेंबर 2023 रोजी एका गुप्त माहितीच्या आधारे कांदिवली पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला बोरिवली येथे हजर करण्यात आले. कोर्टात न्यायाधीशांनी त्याला पोलिस कोठडी सुनावली.

आणखी 90 जणांची फसवणूक : पोलिसांनी सांगितले की, आरोपी राजेश पटेल याने त्याच्या एका मित्रासोबत बोरिवली येथे 90 जणांसोबत अशीच फसवणूक केली होती. त्यांची 11 लाख 27 हजार रुपयांची फसवणूक केली होती. त्याची फिर्याद कस्तुरबा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. त्याचा तपास सुरू आहे. कस्तुरबा यांनी केले आहे. पोलीस त्यांना ताब्यात घेईल.

हेही वाचा:

  1. Bhandara Crime: क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक; दोन आरोपींवर गुन्हा दाखल
  2. Holiday Package Fraud: 'हॉलिडे पॅकेज'च्या नावाखाली हुश्शार पुणेकरांना कोट्यवधी रुपयांचा चुना; कंपनीकडून 'नो रिस्पॉन्स'
  3. Nagpur Crime: उपराजधानीत आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात वाढ, विविध घटनांमध्ये कोट्यवधी रुपयांची फसवणूक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.