मुंबई : रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, 16589 केएसआर बंगळुरू सिटी जंक्शन मिरज राणी चेन्नम्मा एक्स्प्रेसमध्ये २० जानेवारी २०२३ पासून तर 16590 मिरज - केएसआर बंगळुरू सिटी जंक्शन राणी चेन्नम्मा एक्स्प्रेसमध्ये २१ जानेवारी २०२३ पासून एक प्रथम वातानुकूलित, एक द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, १० शयनयान, ३ सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन जनरेटर व्हॅन असे बदल करण्यात आले आहेत.
सोलापूर-म्हैसूर ट्रेनमध्ये असे बदल : सोलापूर-म्हैसूर ट्रेनमध्ये असे बदल - 16535 म्हैसूर जंक्शन - सोलापूर जंक्शन गोलगुम्बाझ एक्स्प्रेसमध्ये २१ जानेवारी २०२३ पासून, तर 16536 सोलापूर जंक्शन-म्हैसूर जंक्शन गोलगुम्बाझ एक्स्प्रेसमध्ये २२ जानेवारी २०२३ पासून एक प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, ५ तृतीय वातानुकूलित, १० शयनयान, ३ सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन जनरेटर व्हॅन असे बदल करण्यात आले आहेत.
येथे संपर्क साधा : रेल्वेने मिरज-बंगळुरू आणि सोलापूर-म्हैसूर एक्स्प्रेसच्या संरचनेत बदल केले आहेत. त्यामुळे प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी त्यांच्या प्रतीक्षा यादीतील तिकिटांची स्थिती तपासावी. या गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा. प्रवाशांनी स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड संदर्भातील नियमांचे पालन करण्याचा सल्ला रेल्वे प्रशासनाने दिला आहे.