ETV Bharat / state

अरुण जेटलींच्या जाण्याने कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली - चंद्रकांत पाटील - माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींच्या निधनाने एक विद्वान, कर्तबगार आणि राष्ट्रीय विचारांसाठी समर्पित नेता गमावला आहे. त्यांच्या जाण्याने पक्षामध्ये निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही.,असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जेटलींना आदरांजली वाहिली.

अरुण जेटली
author img

By

Published : Aug 25, 2019, 3:28 PM IST

मुंबई - माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींच्या निधनाने एक विद्वान, कर्तबगार आणि राष्ट्रीय विचारांसाठी समर्पित नेता गमावला आहे. त्यांच्या जाण्याने पक्षामध्ये निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जेटलींना आदरांजली वाहिली.

भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटलींचे काल (शनिवारी) दिल्लीच्या एम्स रुग्मालयात निधन झाले. त्यांच्या जाण्याने राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याच्या भावना राजकीय वर्तुळातून येत आहे.

भाजपचे प्रचंड कर्तृत्वान असलेले नेते एकामागोमाग एक निघून जात आहेत. मागील काही दिवसात मनोहर पर्रिकर, सुषमा स्वराज आणि आता अरुण जेटलींचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने पक्षाचे मोठे नुकसान झाले असल्याचे पाटील म्हणाले. देशातील व्यवस्था मजबुत होण्यासाठी जेटलींची खूप मोठी मदत झाली. विद्वत्तेबरोबर त्यांच्याकडे नम्रताही होती. तसेच वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांना एकत्र घेऊन जाण्याचे कौशल्य त्यांच्याकडे होते.

Intro:मुंबई - मध्य,आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक तर पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक घेण्यात आला आहे.. परिणामी, आज फेऱ्या कमी चालविण्यात येतील. Body:मध्य रेल्वेच्या कल्याण ते ठाणे दरम्यान सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या जलद मार्गावर आज सकाळी ११.२० ते दुपारी ३.५० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या कालावधीत कल्याणहून सीएसएमटी दिशेकडे येणाऱ्या लोकल कल्याण ते ठाणेदरम्यान धिम्या मार्गावर चालविण्यात येतील.

सकाळी १०.१६ ते दुपारी ३.२२ पर्यंत सीएसएमटीहून कल्याणकडे जाणाऱ्या जलद मार्गावरील लोकल संबंधित थांब्यासह घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, दिवा या स्थानकांवर थांबा घेतील.
हार्बर मार्गावरील कुर्ला आणि वाशीदरम्यान दोन्ही दिशेकडे सकाळी ११.१० ते ३.४० पर्यंत एकही लोकल धावणार नाही. सकाळी १०.३४ ते दुपारी ३.०८ वाजेपर्यंत सीएसएमटीहून वाशी, बेलापूर, पनवेलकडे व सकाळी १०.२१ ते दुपारी ३ वाजेपर्यंत पनवेल ,बेलापूर ,वाशीहून सीएसएमटीकडे एकही लोकल धावणार नाही. ब्लॉकदरम्यान सीएसएमटी ते पनवेल-वाशी, कुर्लादरम्यान विशेष लोकल चालविण्यात येतील.Conclusion:पश्चिम रेल्वे मार्गावर बोरीवली ते भाईंदर या स्थानकांदरम्यान जम्बोब्लॉक घेण्यात आला आहे. आज सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत बोरीवली ते भाईंदर यादरम्यान दोन्ही दिशेकडील जलद मार्गावर ब्लॉक असेल. ब्लॉकदरम्यान दोन्ही दिशेकडील जलद मार्गावरील लोकल विरार, वसई रोड ते बोरीवलीपर्यंत धिम्या मार्गावरून चालविण्यात येतील.
 
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.