मुंबई : मुंबई भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज मुंबई दादर येथील वसंत स्मृती सभागृहात पार पडली. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या हस्ते या कार्यकारणीच उद्घाटन करण्यात आलं तर याचा समारोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी बोलताना बावनकुळे यांनी महाविकास आघाडीचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत मुंबई महानगरपालिकेसाठी मिशन १५० ठरवत कार्यकर्त्यांना जोमाने काम करण्याचे आदेश दिले आहेत.
देवेंद्रजी सारथी तर अर्जुन आशिष शेलार : नाशिक येथे २ दिवसीय भाजप प्रदेश कार्यकारणीची बैठक संपन्न झाल्यानंतर आज मुंबई मध्ये मुंबई भाजप कार्यकरणीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत बोलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, या निवडणुकीत रथाचे सारथी देवेंद्रजी आहेत. तर अर्जुन हे आशिष शेलार आहेत. मुंबई महापालिकेचे युद्ध सुरू झाले असून विजयाचा संकल्प सुद्धा केला गेला आहे. तसेच या निवडणुकी संदर्भात आशिष शेलार आपण जी रणनीती ठरवाल ती योग्यच असेल असेही ते म्हणाले. महाराष्ट्रचे डोके हे मुंबई आहे आणि यावर ज्याची विजयी पताका लागले त्यावर महाराष्ट्राचं भवितव्य अवलंबून राहील असेही बावनकुळे म्हणाले.
२०० प्लस आमदार निवडून येतील : या मुंबई महानगरपालिकेत मागचे सर्व रेकॉर्ड मुंबई पूर्ण करेल असा आत्मविश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला. तसेच २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत२०० प्लस आमदार विधासभेत निवडून येतील. असे सांगत प्रवास आणि संवाद याशिवाय संघटना वाढणार नाही, असेही ते म्हणाले.
अभी नही तो कभी नही : मोदींनी ७५ हजार कोटी समृध्दी महामार्ग प्रकल्पासाठी दिले.पण मोदीजी जेव्हा मुंबईत आले तेव्हा मोदीजी यांचे सर्वांनी स्वागत केले. पण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.प्रवास आणि संवाद याशिवाय संघटन वाढणार नाही. प्रत्येक पदाधिकाऱ्याने २ हजार घरी प्रवास पूर्ण केला पाहिजे. ५०० घरात धन्यवाद मोदीजी, ५०० फ्रेंड्स ऑफ बीजेपी आणि ५०० घरात १८ ते २५ वयोगटाचे युवा वॉरियर्स तयार करायचे आहेत. १ जानेवारी २०२४ मध्ये प्रत्येक बुथवर ४० मतदारांची भर पडणार आहे. संकल्प पूर्ण करण्यासाठी स्वतःची जबाबदारी ओळखून काम करा. तसेच जास्तीत जास्त पक्ष प्रवेश करण्यासाठी काम करा. कारण अभी नही तो कभी नही. असे बावनकुळे म्हणाले.
हेही वाचा - Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला सात वर्षे पूर्ण; वाचा A to Z माहिती