ETV Bharat / state

Maharashtra Weather Update: शेतकरी चिंतेत, राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती - मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

गेल्या आठवड्याभरामध्ये मराठवाडा, विदर्भ त्याचप्रमाणे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हवामानात बदल झाल्याचे दिसून आले. उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आदी ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आता पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हवामान विभागाने ही शक्यता वर्तवली आहे.

mumbai rain
पावसाची शक्यता
author img

By

Published : Mar 11, 2023, 11:12 AM IST

मुंबई : महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये येत्या चार ते पाच दिवसांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. यावेळी विजांचा कडकडाट आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील अशी शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये भर पडणार आहे.

मुसळधार पावसाचा इशारा : उत्तर भारतातील पर्वतरांगांमध्ये तसेच हिमालयात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. त्याचा परिणाम हवामानावर होत आहे. त्यामुळे येत्या चार ते पाच दिवसात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल. यावेळी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील, विजांचा कडकडाट होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

शेतकऱ्यांची चिंता वाढवली : गेल्या आठवड्याभरामध्ये मराठवाडा, विदर्भ त्याचप्रमाणे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हवामानात बदल झाल्याचे दिसून आले. उत्तर महाराष्ट्र कोकण मराठवाडा आदी ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालाय. गहू कांदा फळबागा भाजीपाला यांची पिके जमीन दोस्त झाली आहेत. आता पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने दिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

या जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ : पालघर, सिंधुदुर्ग, नंदुरबार, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे, जालना, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे शेतांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आलेली आहे.

शेतकऱ्यांसमोर अडचणी : खरीप हंगामामध्ये अवकाळी पाऊस झाल्यामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गहू, हरभरा, ही पिके भुईसपाट झाली आहेत. वादळी वाऱ्यासह कोसळणारा पाऊस रब्बी हंगामातील पिकांसाठी घातक असणार आहे. थोड्या प्रमाणात बचावलेली पिके ही सुद्धा भुईसपट होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. आधीच बाजारामध्ये कापूस कांदा सोयाबीन या पिकांना कवडीमोल दर मिळत आहे यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता पुन्हा अवकाळी पाऊस पडल्यास आणखी अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.

हेही वाचा : Mega Block: मध्य हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक; जाणून घ्या रेल्वेचे मार्ग कसे असतील

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.