मुंबई - येत्या 24 ते 48 तासांत मुंबई आणि किनारपट्टीच्या भागात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, तसेच मराठवाड्याच्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची दमदार हजेरी नव्हती. आता पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आहे. काल रात्रीपासून कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सरी मुंबई आणि उपनगरात कोसळत होत्या. ढगाळ वातावरण असल्याने अधून मधून सूर्यदर्शन होत आहे. आज सकाळपर्यंत मुंबई शहरात 23 मिमी, तर उपनगरात 18.1 अशी पावसाची नोंद झाली आहे. हवेत गारवा निर्माण झाला आहे. मुंबई शहरात 30 अंश सेल्सिअस, उपनगरात 31.1 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली, तर किमान तापमान 25 अंश से असे होते.
१ ऑगस्ट: कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता