मुंबई - बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. वेतन करार झाला नाही, तर कामगार संघटनांनी संपाचा इशारा दिला आहे. मात्र सध्या सर्वच संघटनांसोबत चर्चा सुरु आहे. चर्चेमधून मार्ग निघेल त्यामुळे कामगारांनी संप करू नये, असे आवाहन बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी केले आहे.
..त्यामुळे वेतन करारासाठी ठराविक तारीख देणे अशक्य - अनिल पाटणकर - बेस्ट कर्मचाऱ्यांचे आंदोलन
बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. वेतन करार झाला नाही, तर कामगार संघटनांनी संपाचा इशारा दिला आहे. बेस्ट कर्मचारी कालपासून वडाळा डेपोबाहेर धरणे आंदोलन करत आहेत.चर्चेमधून मार्ग निघेल त्यामुळे कामगारांनी संप करू नये, असे आवाहन बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी केले आहे.
बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर
मुंबई - बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. वेतन करार झाला नाही, तर कामगार संघटनांनी संपाचा इशारा दिला आहे. मात्र सध्या सर्वच संघटनांसोबत चर्चा सुरु आहे. चर्चेमधून मार्ग निघेल त्यामुळे कामगारांनी संप करू नये, असे आवाहन बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी केले आहे.
Intro:मुंबई - बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. आज वेतन करार झाला नाही तर कामगार संघटनांनी संपाचा इशारा दिला आहे. मात्र सध्या सर्वच युनियनबरोबर चर्चा सुरु आहे. चर्चेमधून मार्ग निघणार असल्याने कामगारांनी संप करू नये असे आवाहन बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी केले आहे. त्याचवेळी सर्वच युनियन बरोबर चर्चा सुरु असल्याने वेतन करार होण्याची एखादी नक्की तारीख बेस्ट प्रशासन सांगू शकत नाही असेही पाटणकर म्हणाले. Body:वेतन करार, बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा, बोनस आदी मागण्यांसाठी बेस्ट कर्मचारी कालपासून वडाळा डेपोबाहेर धरणे आंदोलन करत आहेत. आज बेस्ट प्रशासन आणि कामगार युनियन यांच्यामध्ये वेतन करार होईल असे शिवसेनेच्या युनियनने सांगितले होते. त्याप्रमाणे अद्याप कोणताही करार झाला नसल्याने कामगार संघटना आणि कृती समिती संपाची हाक देऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांच्याशी संपर्क साधला असता पालिकेने सुचवल्याप्रमाणे आम्ही सुधारणा केल्या आहेत. यामुळे पालिकेने ११३६ आणि ६०० कोटी रुपये दिले असल्याचे पाटणकर यांनी सांगितले.
बेस्टमधून बीआरआय ऍक्ट रद्द झाल्याने सर्वच युनियनबरोबर चर्चा करावी लागत आहे. चर्चेमधून मार्ग निघत आहेत. बेस्टने आपले तिकीट दर ५ रुपये केले आहेत, याकारणाने बेस्टच्या प्रवाशांच्या संख्येत १० लाख प्रवाशांची वाढ झाली आहे. येत्या काही दिवसात मुंबईमधील सर्वात मोठा सण असलेला गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. कामगार संघटना आणि कृतीचे पत्र कालच मला मिळाले आहे. बेस्ट महाव्यवस्थापकांना याबाबत चर्चा करण्यास सांगितले आहे. महाव्यवस्थापक आंदोलनकर्त्या संघटनांबरोबर चर्चा करतील. सर्वच कामगार संघटनांबरोबर चर्चा करावी लागत असल्याने कृती समितीने आंदोलन करावे मात्र संप करू नये. वाढलेले प्रवासी, येणाऱ्या एसी बसेस आणि गणेशोत्सव लाखात घेऊन संप करू नये असे आवाहन पाटणकर यांनी सांगितले.
बातमीसाठी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांचा बाईट Conclusion: