मुंबई - रेल्वे मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानुसार, मध्य रेल्वेच्या काही विशेष गाड्या 1 जूनपासून सुरू करण्यात येणार आहेत. 1 मेपासून चालविण्यात येणाऱ्या श्रमिक विशेष ट्रेन आणि 22 मेपासून विशेष वातानुकूलित गाड्या चालविण्याव्यतिरिक्त काही विशेष गाड्या चालतील. विशेष गाड्यांचे बुकिंग आधीच आयआरसीटीसी वेबसाइट www.irctc.co.in आणि मोबाईल अॅपद्वारे जास्तीत जास्त 30 दिवसांच्या आगाऊ आरक्षण कालावधीनुसार ऑनलाईन सुरू आहे.
1. 01015/01016 लोकमान्य टिळक टर्मिनस - गोरखपूर विशेष
01015 लोकमान्य टिळक टर्मिनस येथून
1 जुनपासून दररोज चालविण्यात येईल.
01016 गोरखपूर येथून 3 जूनपासून पासून दररोज चालविण्यात येईल.
2. 01019/01020 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - भुवनेश्वर विशेष
01019 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 1 जून पासून दररोज चालविण्यात येईल.
01020 भुवनेश्वर येथून 3 जूनपासून दररोज चालविण्यात येईल.
3. 01061/01062 लोकमान्य टिळक टर्मिनस - दरभंगा विशेष
01061 लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 1 जून पासून दररोज चालविण्यात येईल.
01062 दरभंगा येथून 3 जून पासून दररोज चालविण्यात येईल.
4. 01071/01072 लोकमान्य टिळक टर्मिनस - वाराणसी विशेष
01071 लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 1 जून पासून दररोज चालविण्यात येईल.
01072 वाराणसी येथून 3 जून पासून दररोज चालविण्यात येईल.
5. 01093/01094 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - वाराणसी विशेष
01093 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 1 जून पासून दररोज चालविण्यात येईल.
01094 वाराणसी येथून 2 जून पासून दररोज चालविण्यात येईल.
6. 01139/01140 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - गदग विशेष
01139 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 1जून पासून दररोज चालविण्यात येईल.
01140 गदग येथून 2 जून पासून दररोज चालविण्यात येईल.
7. 01301/01302 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - बेंगलुरू विशेष
01301 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 1जून पासून दररोज चालविण्यात येईल.
01302 बेंगलुरू येथून 2जून पासून दररोज चालविण्यात येईल.
8. 02141/02142 लोकमान्य टिळक टर्मिनस - पाटलीपुत्र जं. विशेष
02141 लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 1 जून पासून दररोज चालविण्यात येईल.
02142 पाटलीपुत्र जं. येथून 2 जून पासून दररोज चालविण्यात येईल.
9. 02149/02150 पुणे - दानापूर विशेष
02149 पुणे येथून 1 जून पासून दररोज चालविण्यात येईल.
02150 दानापूर येथून 3 जून पासून दररोज चालविण्यात येईल.
वरील सर्व विशेष गाड्यांचे बुकिंग आधीच आयआरसीटीसी वेबसाइट www.irctc.co.in आणि मोबाईल अॅपद्वारे जास्तीत जास्त 30 दिवसांच्या आगाऊ आरक्षण कालावधी नुसार ऑनलाईन सुरू आहे. कोणत्याही रेल्वे स्थानकावरील आरक्षण काऊंटरवर तिकिटे आरक्षित केली जाणार नाहीत. ‘एजंट’, आयआरसीटीसी एजंट आणि रेल्वे एजंट यांच्यामार्फत तिकिट बुक करण्यास परवानगी नाही.
या वातानुकूलित आणि बिगर वातानुकूलित दोन्ही वर्ग असलेल्या विशेष गाड्या पूर्णपणे राखीव गाड्या असतील. सामान्य द्वितीय श्रेणी (जीएस) डब्ब्यातही बसण्यासाठी राखीव जागा असेल. भाडे सामान्य असेल आणि सामान्य द्वितीय श्रेणी (जीएस) डब्ब्यांसाठी राखीव असल्यास, द्वितीय आसन (2 एस) श्रेणीचे भाडे आकारले जाईल आणि सर्व प्रवाशांना जागा देण्यात येईल.
अस्तित्त्वात असलेल्या नियमांनुसार आरएसी आणि प्रतीक्षा यादी तयार केली जाईल परंतु प्रतिक्षा यादीतील तिकीट धारकांना ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी दिली जाणार नाही.
प्रवाशांना सामान्य सूचना -
१. सर्व प्रवाशांची अनिवार्यपणे तपासणी करण्यात येईल आणि केवळ लक्षणं नसलेल्या प्रवाशांना ट्रेनमध्ये प्रवेश करण्यास / बसण्यास परवानगी आहे.
२. केवळ पुष्टीकृत तिकिट असलेल्या प्रवाशांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश देण्यात येईल.
३. सर्व प्रवाशांनी प्रवेशावेळी आणि प्रवासादरम्यान चेहरा कव्हर, मुखपट्टी घातले असले पाहिजेत.
४. स्टेशनवर थर्मल स्क्रिनिंग सुलभ करण्यासाठी प्रवासी कमीतकमी 90 मिनिटे आधी स्टेशनवर पोहोचेल.
५. प्रवाशांनी स्टेशनवर आणि ट्रेनमध्ये सामाजिक अंतर ठेवले पाहिजे.
६. त्यांच्या गंतव्यस्थानावर आगमन झाल्यानंतर, प्रवाश्यांना गंतव्य राज्य, केंद्रशासित प्रदेशांनी सूचित केलेल्या आरोग्य प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल.