मुंबई Central Railway Ticketless Passengers : मध्य रेल्वेतून दररोज 35 लाखापेक्षा अधिक प्रवासी प्रवास करतात. नाशिक, कसारा, कर्जत, अंबरनाथ, बदलापूर ते छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत हे लाखो प्रवासी रोज ये-जा करतात. मात्र, यामध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लाखांमध्ये आहे. त्यामुळे मध्य रेल्वेनं यावर्षी देखील धडक मोहीम राबवलीय.
विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या : मध्य रेल्वेनं (Central Railway) ऑगस्ट 2023 मध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या एकूण दोन लाख पाच हजार प्रवाशांवर कारवाई केलीय. त्यांच्याकडून एकूण बारा कोटी चार लाख रुपये दंड वसुली मध्य रेल्वेनं केली. तर अनिमित प्रवास करणारे प्रवासी आणि बुकिंग न करता सामान रेल्वेच्या डब्यात चढवणारे किंवा लोकल रेल्वेमध्ये चढवणारे असे एकूण एक लाख 7 हजार प्रकरणे मध्य रेल्वेनं पकडली. त्यांच्याकडून चार कोटी 84 लाख इतकी दंडाची रक्कम वसूल केली. एकूण ऑगस्ट 2023 मध्ये तीन कोटी बारा लाख दंडाची रक्कम वसूल (Railway ticketless passengers) केली.
दोन लाख पाच हजार प्रकरण : त्यामुळं विनातिकीट प्रवास करणाऱ्यांमध्ये अनियमित आणि नियमित प्रवास करणारे आणि सामान विना तिकीट ठेवून प्रवास करणारे, अशा सर्वांची मिळून दोन लाख पाच हजार प्रकरणांमध्ये 16 कोटी 88 लाख इतकी दंडाची रक्कम जमा केलीय. यासंदर्भात मध्य रेल्वेचे संपर्क प्रमुख डॉक्टर मानसपुरे यांनी सांगितलंय की, मागच्या वर्षी मध्य रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या एकूण दोन लाख 28 हजार होती. त्याची एकूण 14 कोटी 30 लाख इतकी वसुली केली गेली होती. अनियमित प्रवास करणारे आणि विना बुकिंग सामान ठेवून चढणारे असे 64,000 प्रवासी होते. त्यांच्याकडून दोन कोटी 86 लाख रुपये जमा केले होते. एकूण मागच्या वर्षीची 17 कोटी 16 लाख दंडाची रक्कम मध्य रेल्वेकडून वसूल केली गेली होती. एकूणच विना तिकीट प्रवास करणाऱ्यांमधील मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा 23 हजार प्रवासी घटले (ticketless passengers) आहे.
हेही वाचा :