मुंबई Central Railway Special Trains : नाताळ (ख्रिसमस) आणि नववर्षाच्या स्वागतासाठी गोवा आणि कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून पनवेल ते मडगावदरम्यान 14 विशेष मेल-एक्स्प्रेस सोडण्यात येणार आहेत. तसंच या विशेष रेल्वे 22 डब्यांसह धावणार आहेत. त्यामुळं ट्रेनमध्ये प्रवाशांना सीटची कमतरता भासणार नाही.
पनवेल- मडगाव-पनवेल विशेष रेल्वे : गाडी क्रमांक 1427, 22 ते 31 डिसेंबरदरम्यान आठवड्यातील शुक्रवार, शनिवार आणि रविवार रोजी सकाळी आठ वाजता विशेष पनवेल येथून सुटेल आणि मडगाव जंक्शन येथे दुसऱ्या दिवशी सहा वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचेल. (गाडी क्रमांक 1428) परतीचा प्रवास सकाळी आठ वाजता सुरू होईल. दरम्यान, या रेल्वेच्या विशेष 12 फेऱ्या असतील.
गाडी क्रमांक 1429 आणि 1430 : गाडी क्रमांक 1430 मडगाव-पनवेल विशेष गाडी मडगाव येथून 1 जानेवारीला रात्री नऊ वाजता सुटणार आहे. तर ही गाडी पनवेलला दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून वीस मिनिटांला पोहोचणार आहे. तर गाडी क्रमांक 1429, 2 जानेवारीला पनवेल-मडगाव विशेष एक्स्प्रेस सकाळी आठ वाजून वीस मिनिटांनी सुटणार आहे. तर ही गाडी मडगाव येथे त्याच दिवशी रात्री साडेनऊ वाजता पोहोचेल. ही रेल्वे रोहा ,खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी इत्यादी रेल्वे स्थानकांवर थांबणार आहे. या गाड्यांच्या 2 फेऱ्या असतील.
अधिक माहितीसाठी येथे साधावा संपर्क : यासंदर्भातील अधिक तपशिलासाठी प्रवाशांनी मध्य रेल्वेच्या संकेतस्थळाला (www.enquiry.indianrail.gov.in) भेट देऊन आपले रेल्वे तिकीट बुक करावे.
हेही वाचा -