मुंबई - पाऊस आणि इतर कारणांनी वारंवार खोळंबणाऱ्या मध्य रेल्वेची वाहतूक आज सकाळी पुन्हा एकदा विस्कळीत झाली. आज सकाळी मुलुंड स्थानकात ओव्हरहेड वायरवर झाडाची फांदी पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, थोड्याच वेळात ही फांदी हटवल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. पण ही वाहतूक उशिराने सुरू आहे.
शनिवारी सकाळी मध्य रेल्वेच्या मुलुंड स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर झाडाची फांदी तुटून ओव्हरहेट वायरवर पडली. त्यामुळे मध्य रेल्वेची सीएसएमटीवरून कल्याणला जाणारी वाहतूक खोळंबली आहे. या खोळंब्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू आहे. लोकलच्या छतावर पडलेले झाड काढण्यात आले असल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे.
-
Mumbai: Part of tree fell on Mulund station's cover over platform (COP) and got entangled with Pantograph of a DN slow local train. The tree branches were later removed and services resumed. pic.twitter.com/g5pMDDqv6y
— ANI (@ANI) July 6, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Mumbai: Part of tree fell on Mulund station's cover over platform (COP) and got entangled with Pantograph of a DN slow local train. The tree branches were later removed and services resumed. pic.twitter.com/g5pMDDqv6y
— ANI (@ANI) July 6, 2019Mumbai: Part of tree fell on Mulund station's cover over platform (COP) and got entangled with Pantograph of a DN slow local train. The tree branches were later removed and services resumed. pic.twitter.com/g5pMDDqv6y
— ANI (@ANI) July 6, 2019