मुंबई - शहरात 2 व 3 जुलैला पडलेल्या पावसाचा सर्वात मोठा फटका मध्य व हार्बर मार्गावरील प्रवाशांना बसला. यानंतर मध्य रेल्वेने रविवारचे वेळापत्रक चालवून टीकेचे धनी होण्यात समाधान मानले. मात्र, आज मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक संजयकुमार जैन यांनी मिठी नदी ओव्हर फ्लो झाल्याने व नाल्याचे पाणी रुळावर आल्याने लोकलसेवा प्रभावित झाल्याचे सांगितले. तर हवामान खात्याने अतिवृष्टी होणार असल्याची सूचना दिल्याने रविवारचे वेळापत्रक चालवले, मात्र, अंदाज चुकल्याचे स्पष्टीकरण दिले.
मिठी नदी, नाले भरल्यामुळे रुळावर पाणीः मध्य रेल्वेचे स्पष्टीकरण
मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक संजयकुमार जैन यांनी मिठी नदी ओव्हर फ्लो झाल्याने व नाल्याचे पाणी रुळावर आल्याने लोकलसेवा प्रभावित झाल्याचे सांगितले. तर हवामान खात्याने अतिवृष्टी होणार असल्याची सूचना दिल्याने रविवारचे वेळापत्रक चालवले असेही ते म्हणाले
मुंबई - शहरात 2 व 3 जुलैला पडलेल्या पावसाचा सर्वात मोठा फटका मध्य व हार्बर मार्गावरील प्रवाशांना बसला. यानंतर मध्य रेल्वेने रविवारचे वेळापत्रक चालवून टीकेचे धनी होण्यात समाधान मानले. मात्र, आज मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक संजयकुमार जैन यांनी मिठी नदी ओव्हर फ्लो झाल्याने व नाल्याचे पाणी रुळावर आल्याने लोकलसेवा प्रभावित झाल्याचे सांगितले. तर हवामान खात्याने अतिवृष्टी होणार असल्याची सूचना दिल्याने रविवारचे वेळापत्रक चालवले, मात्र, अंदाज चुकल्याचे स्पष्टीकरण दिले.
Body:पूर्वी मिठी नदी भरल्यावर सायन स्थानकात उत्तर दिशेने पाणी येत असे. यंदा दक्षिणेकडून पाणी रुळावर आले. सायन, कुर्ला, चुनाभट्टी, कांजुरमार्ग या ठिकाणी पहिल्यादा पाणी भरल्याचे निदर्शनास आले.
नव्याने पाणी साचलेल्या कुर्ला ते टिळक नगर मध्ये असलेल्या बनटर भवन नाल्याची रेल्वे व पालिका अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली आहे. त्याचे काम हाती पालिकेने हाती घेतले असून आज याबाबत पालिकेसोबत बैठक पार पडली. यामुळे यापुढे मध्य रेल्वे पावसातही धावेल असा दावा जैन यांनी केला आहे.
Conclusion:
यंदा 400 एमएम पाऊस पडला तरी मध्य रेल्वे 12 तास सुरळीत धावली. आणि एकही रॅक मरून झाली नाही. मात्र यंदा पावसात 45 रॅकच्या एपिक यंत्रणा बदलण्यात आल्या. त्यामुळे गाड्या कमी सेवेत होत्या असे जैन यांनी म्हटले.