मुंबई - शहर आणि परिसरात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून आवश्यक वस्तू अखंडितपणे मिळण्यासाठी मालवाहतूक आणि संपूर्ण भारतभर निवडक विशेष प्रवासी गाड्या चालवण्या व्यतिरिक्त, मध्य रेल्वेने लॉकडाऊन कालावधीचा उपयोग करून महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा कामे पूर्ण केली आहेत. लॉकडाऊन कालावधीत मध्य रेल्वेने 14 पादचारी पुलांचे स्टील गर्डर उभारणीसाठी आणि 9 पादचारी पुलांच्या जुन्या स्टील स्ट्रक्चर्स काढून टाकण्याकरता 23 ठिकाणी पायाभूत सुविधांचे काम करण्यात आले. या 23 महत्त्वपूर्ण पायाभूत कामांमध्ये मुंबई विभागातील 7, भुसावळ विभागातील 10, नागपूर व सोलापूर विभागात प्रत्येकी एक, पुणे विभागातील 3 आणि निर्माण शाखेतील एक काम होते.
तपशील खालीलप्रमाणे :
मुंबई विभाग - डोंबिवली स्थानकात 6 मीटर रुंद आणि बेलापूर स्थानकाजवळ 3.66 मीटर रुंद मध्यभागी पादचारी पूलाच्या, गर्डरची उभारणी करण्यात आली. वडाळा रोड येथील पादचारी पुलाचे 2 जीर्ण पोलादी स्पॅन, अंबरनाथ येथे पादचारी पुलाचा एक स्पॅन, अंबिवली येथे पादचारी पुलाचा एक स्पॅन, आटगाव येथे पादचारी पुलाचे 2 स्पॅन काढून टाकण्यात आले. वाशिंद रेल्वे स्थानकात 100 वर्षांहून अधिक जुन्या पादचारी पुलाचे दोन स्पॅन तोडण्यात आले.
नागपूर विभाग - वर्धा स्थानकावर 16 रेल्वे ट्रॅक ओलांडणाऱ्या 6 मीटर रुंद पादचारी पुलाच्या गर्डरचे 6 स्पॅन उभारण्यात आले.
भुसावळ विभाग - भुसावळ स्थानकावर जुना पादचारी पुल बदलून त्याऐवजी नवीन 4.88 मीटर रूंद पादचारी पूलाच्या गर्डरची उभारणीचे कार्य सुरू. भुसावळ-बडनेरा विभागातील बोदवड स्टेशनवर 3.66 मीटर रुंदीच्या पादचारी पुलाचे आणि बडनेरा-नरखेड भागातील नवीन अमरावती येथे एक पादचारी पुलाची गर्डर उभारण्यात आले.
अकोला विभाग - अकोला स्थानकात जुन्या पादचारी पुलाच्या ऐवजी 6 मीटर रुंदीच्या नवीन पादचारी पुलाच्या गर्डरच्या उभारणीची सुरूवात करण्यात आली. चांदूरबाजार स्टेशन व बडनेरा-नरखेड विभागातील अमरावती स्थानक आणि भुसावळ-बडनेरा विभागातील नांदुरा स्टेशनवर 3.66 मीटर रुंदीच्या पादचारी पुलाच्या उभारणीसाठी गर्डरची सुरुवात. भुसावळ, नाशिक रोड आणि शेगाव स्थानकांवर जुन्या पादचारी पुलाचे जुने नालीदार स्टील स्ट्रक्चर्स काढून टाकण्यात आले.
सोलापूर विभाग - दौंड स्थानकावर 6 मीटर रुंद पादचारी पूलाच्या गर्डरच्या उभारणीसाठी सुरुवात झाली आहे.
पुणे विभाग - कडेठाण स्थानकावर 3.66 मीटर रुंद पादचारी पुलाचे, चिंचवड स्टेशनवर 6 मीटर रुंद पादचारी पुलाच्या गर्डर उभारणीसाठी सुरुवात करण्यात आली आहे. तळेगाव स्थानकात पादचारी पुलाचे दोन स्पॅन काढून टाकण्यात आले आहेत. निर्माण विंगपुणे विभागातील भवानीनगर स्थानकावर 3 मीटर रुंदीच्या पादचारी पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे.