ETV Bharat / state

केंद्र सरकारचा महाराष्ट्राबरोबर दुजाभाव; नवाब मालिकांचा पुराव्यानिशी आरोप

आम्ही हे रेमडेसिवीर दिल्यास आमचा परवाना रद्द करण्याची धमकी दिली असल्याचे कंपन्यांनी सांगितले असल्याचे नवाब मलिक यांनी याआधी सांगितले होते. मात्र, त्यांच्या आरोपांचे खंडन करत पुरावे असतील, तर समोर ठेवावे, असा इशारा भाजपच्या नेत्यांकडून देण्यात आला. त्यानंतर नवाब मलिक यांच्याकडून गुजरातच्या 'फूड आणि ड्रॅग' प्रशासनाचे पत्र ट्विट करत गुजरातला रेमडेसिवीरचा पुरवठा कसा महाराष्ट्र पेक्षा अधिक केला जातो, हे सांगण्यात आले आहे.

Central Governments discrimination  with Maharashtra nawab malik accused with evidence
केंद्र सरकारचा महाराष्ट्राबरोबर दुजाभाव; नवाब मालिकांचा पुराव्यानिशी आरोप
author img

By

Published : Apr 17, 2021, 6:51 PM IST

मुंबई - नवाब मलिक यांच्याकडून गुजरातच्या 'फूड आणि ड्रॅग' प्रशासनाचे पत्र ट्विट करत गुजरातला रेमडेसिवीरचा पुरवठा कसा महाराष्ट्र पेक्षा अधिक केला जातो हे सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून रेमडेसिवीर निर्यातीवर बंदी घातली गेल्याने भारतातील १६ निर्यातदारांना स्वतःकडे असलेल्या २० लाख रेमडेसिवीरच्या कुपी विकायला परवानगी मिळत नाही. केंद्रसरकार त्यास नकार देत असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

Central Governments discrimination  with Maharashtra nawab malik accused with evidence
नवाब मलिकांचे ट्विट

टफूड आणि ड्रॅग' प्रशासनाचे पत्र केले ट्विट -

राज्यसरकारने १६ निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडे रेमडेसिवीरबाबत विचारणा केली असता , केंद्रसरकारने महाराष्ट्रात रेमडेसिवीर औषध पुरवठा करण्यास बंदी घातली आहे. जर आम्ही हे रेमडेसिवीर दिल्यास आमचा परवाना रद्द करण्याची धमकी दिली असल्याचे कंपन्यांनी सांगितले असल्याचे नवाब मलिक यांनी याआधी सांगितले होते. मात्र, त्यांच्या आरोपांचे खंडन करत पुरावे असतील, तर समोर ठेवावे, असा इशारा भाजपच्या नेत्यांकडून देण्यात आला. त्यानंतर नवाब मलिक यांच्याकडून गुजरातच्या 'फूड आणि ड्रॅग' प्रशासनाचे पत्र ट्विट करत गुजरातला रेमडेसिवीरचा पुरवठा कसा महाराष्ट्र पेक्षा अधिक केला जातो, हे सांगण्यात आले आहे.

'फूड आणि ड्रॅग' प्रशासनाचे पत्र

पुरावा द्या, नाहीतर राजीनामा द्या; भाजपाची मागणी -

भाजपचे आमदार अतुल भातकळकर यांनी नवाब मलिक यांना पुरावा द्या, नाहीतर राजीनामा द्या, अशी मागणी केली होती. भाजपने मलिक यांच्या आरोपानंतर सरकारच्या भूमिकेवर कडाडून टीका केली. राज्यात एकीकडे परिस्थिती हाताबाहेर जात आहे. अनेक रुग्णांना बेड उपलब्ध होत नाही. तसेच ऑक्सिजन आणि औषधांचा तुटवडा जाणवत आहे. कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यात सरकारला अपयश येत असल्यानेच आता केंद्रावर आरोप केले जात असल्याचे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटले होते. त्याला या पत्रातून उत्तर देण्याचा प्रयत्न नवाब मलिक यांच्याकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा - करण जोहरने कार्तिक आर्यनला वगळले: सुशांतवर आलेला प्रसंग त्याच्यावर लादू नका, कंगना पुन्हा आक्रमक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.