ETV Bharat / state

केंद्राकडून साडेतीन लाख पीपीई किट मागवल्या; मात्र, आल्या तीस हजार

author img

By

Published : Apr 16, 2020, 8:10 PM IST

Updated : Apr 16, 2020, 8:26 PM IST

राज्यात कोरोनाचा आकडा ३ हजार १०० वर पोहोचला आहे. तसेच १९४ मृत्यू झाले आहेत. मात्र, यामध्ये ८३ टक्के लोकांचा दुर्धर आजार असलेल्यांचा समावेश आहे. त्यामुळे जनतेनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन टोपे यांनी केले. तसेच कोरोनाबाबत सर्वत्र जनजागृती करत आहोत. कोणालाही लक्षणे दिसल्यास लवकरात तपासणी करून घ्यायला पाहिजे, असेही ते म्हणाले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे
आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई - कोरोनाच्या चाचण्यांची सुविधा वाढवणार आहे. तसेच चाचणी झाल्यानंतर अहवाल लवकरात लवकर प्राप्त व्हावा, यासाठी देखील प्रयत्न केला जात आहे तसेच पूल टेस्टींगची परवानगी केंद्र सरकारला मागितली आहे. त्यामुळे चाचण्या करण्याचा वेग वाढेल. केंद्राकडे साडेतीन लाख पीपीई किट मागवले. मात्र, फक्त तीस हजार किट आल्या. त्यामुळे केंद्र सरकारने वेगाने मदत करावी, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

देशातील एकूण चाचण्यांपैकी राज्यात २० टक्के चाचण्या करण्यात आल्या. ५१ हजार चाचण्या झाल्या. यापैकी ५० टक्के मुंबईमध्ये झाल्या आहेत. चाचण्याच्या तुलनेमध्ये पॉझिटिव्ह आलेले रुग्ण फक्त ४ टक्के आहे. तसेच प्लाझमा थेरपीची परवानगी आयसीएमआर आणि केंद्र सरकारला मागितली आहे. बरे झालेल्या रुग्णांच्या शरीरातून प्लाझ्मा काढून कोरोनाबाधितांना दिला तर रुग्ण लवकर बरा होतो. त्यामुळे या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कोरोनावर मात करू शकतो, असे राजेश टोपे म्हणाले.

राज्यात कोरोनाचा आकडा ३ हजार १०० वर पोहोचला आहे. तसेच १९४ मृत्यू झाले आहेत. मात्र, यामध्ये ८३ टक्के लोकांचा दुर्धर आजार असलेल्यांचा समावेश आहे. त्यामुळे जनतेनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन टोपे यांनी केले. तसेच कोरोनाबाबत सर्वत्र जनजागृती करत आहोत. कोणालाही लक्षणे दिसल्यास लवकरात तपासणी करून घ्यायला पाहिजे, असेही ते म्हणाले.

लॉकडाऊनमध्ये शिथिलता २० तारखेनंतर देण्याचा विचार केला जाईल. जीवनावश्यक वस्तूबाबत आणि शेती, उद्योग-धंद्याबाबत शिथिलता देण्यात येईल. मात्र, त्यांना काही मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करणे बंधनकारक राहील, असेही ते म्हणाले.

Last Updated : Apr 16, 2020, 8:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.