ETV Bharat / state

अवकाळी मदतीबाबत केंद्राकडून राज्याची बोळवण; मागणीपेक्षा 12 हजार 939 कोटी कमी - ajit navale

राज्य सरकारने आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन विभागातर्फे पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी 7288.05 कोटीचा प्रस्ताव पाठवला. तसेच अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीसाठी 7207.79 कोटींचा प्रस्ताव पाठवला होता. दोन्ही प्रस्ताव मिळून 14 हजार 496 कोटी रुपये राज्याला मिळणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात फक्त 1556.93 कोटी राज्याला मिळाले आहेत.

central government farmers relief fund
राज्याच्या १४ हजार ६०० कोटींच्या मागणी वाटाण्याच्या अक्षता
author img

By

Published : Jan 7, 2020, 9:05 AM IST

मुंबई - राज्य सरकारने पूरग्रस्त आणि अवकाळी ग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्राकडे 14 हजार 600 कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र, केंद्र सरकारने पूर आणि अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीसाठी फक्त 1546.93 कोटी रुपये मंजूर केले आहे. राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या उणिवा आणि अवकाळी पावसाच्या मदतीवरून अल्पमतीने शेतकरी आणखी संकटात येण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, राज्याने केंद्र सरकारला आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन विभागातर्फे जुलै-ऑगस्ट २०१९ मध्ये पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी 15 ऑक्टोबरला 7288.05 कोटी रुपयांचा नुकसानभरपाईचा प्रस्ताव पाठवला होता. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीसाठी 7207.79 कोटींचा प्रस्ताव 22 नोव्हेंबरला पाठवला होता. या दोन प्रस्तावांचे 14 हजार 496 कोटी रुपये राज्याला मिळणे अपेक्षित होते. यापूर्वी केंद्र सरकारने 600 कोटी रुपये राज्याला दिले आहेत. केंद्र सरकारने आपत्ती निवारणाच्या पोटी आज महाराष्ट्राला 956.93 कोटी दिले. त्यामुळे एकूण 1556.93 कोटी राज्याला मिळाले आहेत. महाराष्ट्राची मागणी एकूण 14 हजार 496 कोटी रुपयांची होती. म्हणजेच महाराष्ट्राला मागणीपेक्षा 12 हजार 939 कोटी कमी मिळाले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत झालेल्या बैठकीमध्ये सात राज्यांसाठी 5 हजार 908 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. यामधून महाराष्ट्राच्या वाट्याला केवळ 956. 93 कोटी रुपये मिळाले आहेत. मंत्री स्तरावरून हा निधी मिळाल्याचे सांगितले गेले नाही.

केंद्र आणि राज्याच्या भांडणात शेतकरी भरडतो - डॉ. अजित नवले

कर्जमुक्ती योजनेतील त्रुटींकडे किसाने सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी लक्ष वेधले. नैसर्गिक संकटात शेतकरी भरडला आहे. मात्र, तुटपुंज्या मदतीने शेतकरी आणखी हवालदिल होत आहे. त्यातच केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणामध्ये शेतकरी भरडत असल्याची टीका डॉ. नवले यांनी केली आहे.

केंद्र आणि राज्याच्या भांडणात शेतकरी भरडतो - डॉ. अजित नवले

नैसर्गिक आपत्तीग्रस्तांच्या मदतीची वस्तूस्थिती -

  • मदतीला पात्र असलेल्या शेतकरी - 1 कोटी 35 लाख
  • नुकसान झालेले क्षेत्र - 94 लाख हेक्टर
  • केंद्राकडून अपेक्षित असलेली मदत - 14, 496 कोटी
  • केंद्राने आतापर्यंत केलेली मदत - 1556.93 कोटी
  • राज्याने मदतीसाठी राखून ठेवलेला निधी - 10 हजार कोटी
  • राज्याने राखीव निधीतून वाटलेली मदत - 6500 कोटी

Intro:Body:mh_mum_mantralay_farmer_relief_mumbai_7204684

अवकाळी मदतीसाठी केंद्राकडून
राज्याची बोळवण

 केंद्राकडे 14 हजार 600 कोटींची मागणीला वाटाण्याच्या अक्षता
Byte : ajit Navale attached

मुंबई : राज्य सरकारने पूरग्रस्त आणि अवकाळी ग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्राकडे 14 हजार 600 कोटी रुपयांची मागणी नंतर केंद्र सरकारने महाराष्ट्रात पुरामुळे तसंच अवकाळी पावसाने नुकसानीपोटी फक्त 1546.93 कोटी मंजूर केले आहे.
राज्य सरकारच्या कर्जमाफी च्या उणिवा
आणि अवकाळी पावसाच्या मदती वरून अल्पमतीने शेतकरी आणखी संकटात येण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, राज्याने केंद्र सरकारला आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन विभागातर्फे जुलै-ऑगस्ट २०१९ मध्ये पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी १५ ऑक्टोबर रोजी ७२८८.०५ कोटी रुपये नुकसानभरपाईचा प्रस्ताव पाठवला होता. तर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा ७२०७.७९ कोटींचा प्रस्ताव २२ नोव्हेंबर रोजी पाठवला होता. या दोन प्रस्तावांचे १४,४९६ कोटी रुपये राज्याला मिळणे अपेक्षित होते.यापूर्वी केंद्र सरकारने 600 कोटी राज्याला दिले आहेत. केंद्र सरकारने आपत्ती निवारणाच्या पोटी आज महाराष्ट्राला 956.93 कोटी दिल्याने एकूण 1556.93 कोटी मिळाले आहेत...
महाराष्ट्राची मागणी एकूण 14,496 कोटी ची होती. म्हणजेच महाराष्ट्राला मागणीपेक्षा 12,939 कोटी कमी मिळाले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत झालेल्या बैठकीमध्ये सात राज्यांसाठी 5908 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे
.यातून महाराष्ट्राच्या वाट्याला केवळ 956. 93 कोटी रुपये मिळाले आहेत.मंत्री स्तरावरून अद्याप आजचा निधी मिळाल्याचे कन्फर्मेशन नाही.

किसान सभेचे सरचिटणीस डॉ.अजित नवले यांनी केंद्र आणि राज्याच्या भांडणात शेतकरी भरडत असल्याचं म्हटलं आहे. नुकत्याच राज्य सरकारने जाहीर केलेल्या महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेतील त्रुटींकडे लक्ष वेधत त्यांनी नैसर्गिक संकटात शेतकरी भरडला असून तुटपुंज्या मदतीने शेतकरी आणखी हवालदिल होत असल्याचं म्हटलं आहे.

नैसर्गिक आपत्ती ग्रस्तांच्या मुदतीची वस्तूस्थिती:
- मदतीला पात्र असलेल्या शेतकरी: १ कोटी ३५ लाख
- नुकसान झालेले क्षेत्र: ९४ लाख हेक्टर
- केंद्राकडून अपेक्षित असलेली मदत:१४,४९६ कोटी
- केंद्राने आतापर्यंत केलेली मदत:1556.93 कोटी

- राज्याने मदतीसाठी राखून ठेवलेला निधी: 10 हजार कोटी
- राज्याने राखीव निधीतून वाटलेली मदत: 6500 कोटीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.