ETV Bharat / state

Central Cabinet Expansion : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला ३ मंत्री पदे मिळण्याची शक्यता ; 'यांची' नावे चर्चेत - केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला ३ मंत्री पदे मिळणार आहेत. मुंबईतून उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तिकर, मावळ मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे हे शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. बुलढाणा लोकसभेचे खासदार प्रताप जाधव आणि रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांच्यात मोठी चुरस निर्माण झाली आहे.

Central Cabinet Expansion
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार
author img

By

Published : Jan 20, 2023, 12:30 PM IST

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिंदे गटाला ३ मंत्रीपद मिळण्याच्या शक्यतेवर शिक्कामोर्तब झाले आहे. लवकरच होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला तीन मंत्रिपद मिळणार आहेत. परंतु त्यामध्ये किती कॅबिनेट मंत्रीपद असणार की तिन्ही राज्यमंत्रीपद असणार याबाबत अजूनही थोडासा संभ्रम आहे. परंतु ही तीन नावे कोणती असतील ? याबाबत सर्व अधिकार हे एकनाथ शिंदे यांना असून त्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.

३ मंत्रीपदावर शिक्कामोर्तब : महाराष्ट्रात नाट्यमय सत्तांतरानंतर झालेल्या सत्ता स्थापनेत स्वतः एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदी विराजमान करून भाजपने अनेक मंत्रीपद सुद्धा त्यांच्या गटाला दिली. त्याचबरोबर शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) १८ पैकी १३ खासदार हे सुद्धा शिंदे गटात सामील झाले. परंतु केंद्रीय नेतृत्वामध्ये त्यांना संधी देण्यात आली नव्हती. ती संधी आता चालून आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला ३ मंत्री पद मिळणार असल्याचे जवळपास नक्की झाले असून एकनाथ शिंदे यांनी यासाठी दोन कॅबिनेट मंत्री व एक राज्य मंत्रीपद मिळावे, अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त केली आहे. परंतु त्याऐवजी त्यांना ३ राज्यमंत्रीपद मिळणार असल्याचे जवळपास नक्की मानले जात आहे.

शिंदेंचा करिश्मा कायम : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात शिंदे - फडणवीस सरकार अस्तित्वात आले. एकनाथ शिंदे सोबत शिवसेनेचे १३ खासदारही शिंदे गटात सामील झाले. शिंदे यांच्यासोबत असलेल्या ४० आमदारांच्या जोरावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांना राज्याचे मुख्यमंत्रीपद दिले. त्याच्यापुढे जाऊन शिंदे यांनी लोकसभेतील शिवसेनेचे १३ खासदार आपल्यासोबत आणल्याने भाजपचे केंद्रीय नेतृत्व त्याहूनही शिंदेंवर अधिक खुश झाले आहे. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात अनेकदा चर्चेचे प्रसंग आले. यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा मुद्दा सुद्धा उपस्थित केल्याची चर्चा आहे. एकंदरीत या संपूर्ण प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडवणीस हे निभावत असून त्यांनी सुद्धा येणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळात विस्तारात शिंदे गटाला योग्य तो सन्मान दिला जाणार असल्याचेही सांगितले आहे. त्या कारणास्तव आता शिंदे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात ३ मंत्री पद मिळणार हे जवळपास नक्की मानले जात आहे.

यांची नावे चर्चेत : यामध्ये मुंबईतून उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तिकर यांच्या नावाची चर्चा आहे. त्याचबरोबर मावळ मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे हे शिंदे यांच्या खास मर्जीतले असल्याकारणाने त्यांचाही केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मावळ मतदारसंघात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा भाग सुद्धा यामध्ये येतो. त्यामुळे भरणे यांच्या वतीने या दोन्ही भागाला सुद्धा प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यानंतर तिसरे मंत्रीपद हे विदर्भाच्या वाट्याला जाणार असून यासाठी बुलढाणा लोकसभेचे खासदार प्रताप जाधव आणि रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांच्यात मोठी चुरस निर्माण झाली आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या शिंदे गटाच्या खासदारांना मंत्रिमंडळाला संधी मिळणार नाही, असे एकंदरीत चित्र आहे. कारण मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात भाजपचे खासदार हे केंद्रीय मंत्रिमंडळात यापूर्वीच मंत्री असल्याकारणाने त्या वादात कोणी पडणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

शेवाळे की कीर्तीकर : मुंबईतून उद्धव ठाकरे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी अखेरच्या क्षणी शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता. शिंदे गटाचे दक्षिण मध्य मुंबईचे दुसरे खासदार लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे हे सुद्धा मंत्री पदाच्या रांगेत आहेत. परंतु सध्या त्यांच्यावर एका महिलेने केलेल्या आरोपामुळे ते अडचणीत सापडले आहेत. खासदार गजानन कीर्तिकर वरिष्ठ नेते असल्याने त्याच बरोबर मोदी मंत्रिमंडळात उद्धव ठाकरे यांनी त्यांना बाजूला सारून अरविंद सावंत यांना मंत्री केले होते, म्हणून आता गजानन कीर्तीकर यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तवली जात आहे.

हेही वाचा : Eknath Shinde Speech : लक्झमबर्गचे पंतप्रधान मला म्हणाले मी मोदींचा भक्त-एकनाथ शिंदे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.