ETV Bharat / state

रमजान ईद साध्या पद्धतीने घरी थांबूनच साजरी करा; थोरातांचे आवाहन - eid amid lockdwon

रामनवमी,  हनुमानजयंती, गुढीपाडवा, महावीर जयंती,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीही सर्वांनी साध्या पद्धतीने व शांततेने साजरी केली. यंदाचा ईद–उल-फित्रचा उत्सवही अशाचप्रकारे साजरा करावा, असे थोरात म्हणाले.

रमजान ईद साध्या पद्धतीने घरी थांबूनच साजरी करा; थोरातांचे आवाहन

author img

By

Published : May 24, 2020, 9:37 PM IST

मुंबई - इस्लाममध्ये पवित्र रमजान महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आणि स्थान आहे. परंतु यावर्षीचा रमजान कोरोना संकटाच्या सावटाखाली आल्यामुळे महिनाभर मुस्लीम बांधवांनी घरीच प्रार्थना करून सरकारी नियमांचे पालनही केले आहे. आता रमजान ईदलासुद्धा घराबाहेर न पडता घरात थांबूनच ईद-उल-फित्र साजरी करावी आणि समाजापुढे एक आदर्श घालून द्यावा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

देशावर कोरोनाचे आलेले संकट पाहता सर्व मुस्लीम बांधवांनी साध्या पद्धतीने रमजानचा महिना घराबाहेर न पडता, गर्दी न करता शासनाने वेळोवेळी घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करुन पार पाडला. रामनवमी, हनुमानजयंती, गुढीपाडवा, महावीर जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीही सर्वांनी साध्या पद्धतीने व शांततेने साजरी केली. यंदाचा ईद–उल-फित्रचा उत्सवही अशाचप्रकारे साजरा करावा, असे थोरात म्हणाले.

ईदच्या निमित्ताने सर्व जाती-धर्मातील गोरगरीब, गरजू, कामगार यांना आवश्यक ती मदत करावी हीच ईदी ठरेल. लॉकडाऊनचे उल्लंघन करू नये. मास्क वापरावा. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा न देता फोन, एसएमएस, व्हॉट्सएपसारख्या समाजमाध्यमांचा वापर करून द्याव्यात, असे आवाहन करून थोरात यांनी जनतेला रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.