ETV Bharat / state

गर्दी न करता साधेपणाने ख्रिसमस साजरा करा; नाताळनिमित्त राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा - नाताळनिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुभेच्छा

नाताळ हा प्रेम आणि आपुलकीचा संदेश देणारा सण आहे. येशु ख्रिस्तांची शिकवण ही माणसातील देवत्वाला माननारी होती. त्यामुळेच त्यांनी करूणामयी, क्षमाशील आणि प्रेमळ मार्गाने जीवन जगण्याचा संदेश दिला. त्यांची हीच शिकवण आजही आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक असल्याचे सांगून येशूंचा मानवतावादी दृष्टीकोन अंगिकारल्यास समाजात शांतता आणि सौहार्द निर्माण होईल, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

मुंबई
मुंबई
author img

By

Published : Dec 24, 2020, 9:56 PM IST

मुंबई - नाताळनिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून सर्वांनी येशू ख्रिस्तांच्या प्रेम, करूणा आणि क्षमा या तत्वांचे आचरण करायला हवे असे म्हटले आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी गर्दी न करता साधेपणाने ख्रिसमस साजरा करावा, कोरानासंदर्भात घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

नाताळ हा प्रेम आणि आपुलकीचा संदेश देणारा सण आहे. येशु ख्रिस्तांची शिकवण ही माणसातील देवत्वाला माननारी होती. त्यामुळेच त्यांनी करूणामयी, क्षमाशील आणि प्रेमळ मार्गाने जीवन जगण्याचा संदेश दिला. त्यांची हीच शिकवण आजही आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक असल्याचे सांगून येशूंचा मानवतावादी दृष्टीकोन अंगिकारल्यास समाजात शांतता आणि सौहार्द निर्माण होईल असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी गर्दी न करता साधेपणाने ख्रिसमस साजरा करावा, कोरोनासंदर्भात घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले आहे.

राज्यपालांच्याही शुभेच्छा -

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र व गोव्यातील जनतेला नाताळ निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. सर्व जगभर साजरा केला जाणारा नाताळचा सण भगवान येशू ख्रिस्तांच्या प्रेम, दया व करुणेने परिपूर्ण भरलेल्या जीवनाचे स्मरण देतो. येशू ख्रिस्तांनी मानवतेच्या कल्याणासाठी संपूर्ण आयुष्य वेचले. नाताळचा पवित्र सण सर्वांच्या जीवनात आनंद, आरोग्य व संपन्नता घेऊन येवो, अशी मी प्रार्थना करतो. सर्वांना नाताळ तसेच आगामी वर्ष २०२१ निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

नाताळ सणा सर्वांच्या जीवनात उत्तम आरोग्य घेऊन येवो - अजित पवार

भगवान येशूंच्या जन्मदिनानिमित्ताने साजरा होणारा नाताळचा सण सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, समाधान, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो. समाजात एकता, बंधुता, सहकार्याची भावना वाढीस लावणारा ठरो अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान येशू ख्रिस्तांनी जगाला दया, क्षमा, शांती, परोपकाराचा संदेश दिला. संपूर्ण जीवन मानवतेच्या कल्याणासाठी काम केले. वर्षअखेरीस येणारा नाताळचा सण सर्वत्र आनंद, चैतन्य, उत्साहाचे वातावरण घेऊन येतो. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आनंद देणारा नाताळ यंदाही उत्साहात साजरा करायचा आहे, परंतु सण साजरा करताना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे व सुरक्षिततेचे पालन केले पाहिजे. स्वत:चे, कुटुंबाचे, समाजाचे कोरोनापासून संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे, ती पार पाडूया असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.