ETV Bharat / state

सीबीएसईसाठी १ हजार ५०० अधिक परीक्षा केंद्र वाढविणार, रमेश पोखरियाल यांची माहिती - १० वी १२ वी सीबीएसई परीक्षा

विशेष म्हणजे देशभरातील सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना यापूर्वी ३ हजारांच्या दरम्यान परीक्षा केंद्र होती. त्यात दुप्पटीने वाढ करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना आपल्याच शाळांमध्ये ही परीक्षा देता येणार असून यापूर्वी बऱ्याच ठिकाणी परीक्षा केंद्र दूर-दूर होती, ती अडचणही यामुळे कमी होणार असल्याचेही मनुष्यबळ विकास मंत्र्यांने म्हटले आहे.

CBSE exams during corona  CBSE 10th 12th exams  CBSE examination centers  union HRD minister ramesh pokhriyal  कोरोनामध्ये सीबीएसई परीक्षा  सीबीएसई परीक्षा केंद्र  १० वी १२ वी सीबीएसई परीक्षा  केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल
सीबीएसईसाठी १ हजार ५०० अधिक परीक्षा केंद्र वाढविणार, रमेश पोखरियाल यांची माहिती
author img

By

Published : May 25, 2020, 8:15 PM IST

मुंबई - देशात कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या जुलै महिन्यात होणाऱ्या परीक्षांसाठी नियमित परीक्षा केंद्रासोबत अधिकची १ हजार ५०० परीक्षा केंद्र वाढविणार आहे. सीबीएसईच्या परीक्षेत प्रत्येक विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्स पाळण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी एक ट्वीट करून दिली आहे.

विशेष म्हणजे देशभरातील सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना यापूर्वी ३ हजारांच्या दरम्यान परीक्षा केंद्र होती. त्यात दुप्पटीने वाढ करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना आपल्याच शाळांमध्ये ही परीक्षा देता येणार असून यापूर्वी बऱ्याच ठिकाणी परीक्षा केंद्र दूर-दूर होती, ती अडचणही यामुळे कमी होणार असल्याचेही मनुष्यबळ विकास मंत्र्यांने म्हटले आहे.

सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा १ जुलै ते १५ जुलै या कालावधी दरम्यान घेतल्या जाणार आहेत. देशभरातील लॉकडाऊनच्या काळात राहिलेल्या सर्व पेपरच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. यात दहावीचे चार पेपर शिल्लक राहिले हेाते, त्यात समाजशास्त्र, विज्ञान, हिंदी, इंग्रजी संभाषण या पेपरांचा समावेश आहे. तर बारावीचे तब्बल विविध विभागातील २३ पेपरची शिल्लक राहिलेले आहेत. त्यात राष्ट्रीय स्तरावरील आणि विभागातीय स्तरावरील पेपरांचा समावेश आहे. यात गृहशास्त्र, रसानशास्त्र, व्यावसायिक अभ्यास, जैव तंत्रज्ञान, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, गणित, अर्थशास्त्र, इतिहास आदी विषयांचा समावेश आहे.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी दिलेल्या या नवीन माहितीमुळे देशभरात सीबीएसईच्या दहावी-बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना प्रत्येक परीक्षा केंद्रांवर सोशल डिस्टन्सचा योग्य वापर करता येणार आहे. यापूर्वीच सीबीएसईने देशातील सर्व परीक्षा केंद्रात येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्यासोबत सॅनिटायझ्रर ठेवणे बंधनकारक आहे. तसेच चांगल्या दर्जाचा मास्क घालणे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये अंतर ठेवणे यासाठीचे आदेश दिले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.