मुंबई- सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआयकडून तब्बल 5 तासांहून अधिक वेळ चौकशी करण्यात येत आहे. रिया चक्रवर्ती हिला सीबीआयने समन्स दिले होते. आज सकाळी 11 वाजता रिया चक्रवर्ती ही सीबीआय कार्यालयात चौकशीसाठी हजर झाली होती. आतापर्यंत तब्बल पाच तासांहून अधिक वेळ रिया चक्रवर्तीची हिची चौकशी करण्यात आलेली आहे. रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शोविक चक्रवर्ती, सिद्धार्थ पिठाणी व नीरज सिंग हेसुद्धा सीबीआयच्या पथकासमोर चौकशीसाठी हजर झाले आहेत. डीआरडीओ कार्यालया बाहेरुन आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी आढावा घेतला आहे.
सुशांतसिंह राजपूत प्रकरणी तब्बल सात दिवस चौकशी केल्यानंतर या संदर्भात सीबीआय च्या पथकाकडून सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीला चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा देखील सीबीआय चौकशीसाठी हजर झाला होता.
हेही वाचा-रिया चक्रवर्ती सीबीआय चौकशीत...तर, रामदास आठवले सुशांतच्या वडिलांच्या भेटीला
सुशांतसिंह राजपूत ने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आर्थिक बाजूंचा तपास अंमलबजावणी संचलनालय तर अमली पदार्थांचे कनेक्शन आहे का याचा तपास राष्ट्रीय नार्कोटिक्स ब्युरो करत आहे.