ETV Bharat / state

टुलकिट प्रकरणी संबित पात्रा यांच्यावर गुन्हा दाखल करा - भाई जगताप - mumbai congress latest news

टुलकिट प्रकरणी भाजपा नेते संबित पात्रा यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी मुंबई कॉंग्रेसचे नेते भाई जगताप यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी शिष्टमंडळासह मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची भेट घेतली.

toolkit case latest update
टुलकिट प्रकरणी संबित पात्रा यांच्यावर गुन्हा दाखल करा - भाई जगताप
author img

By

Published : May 27, 2021, 8:14 PM IST

मुंबई - टुलकिट प्रकरणी भाजपा नेते संबित पात्रा यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी मुंबई कॉंग्रेसचे नेते भाई जगताप यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची भेट घेतली आहे. भाजपाने कॉंग्रेसच्या लेटरहेटचा वापर करत बनावट पत्र तयार केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

प्रतिक्रिया

काय आहे टुलकिट प्रकरण -

संबित पात्रा यांनी १८ मे रोजी एक ट्विट केले होते. त्यात त्यांनी काँग्रेस पक्ष एका टूलकिटद्वारे कोरोना संकटाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप त्यांनी केला होता. तसेच काँग्रेस टूलकिटच्या माध्यमातून सरकारच्या विरोधात वातावरण निर्माण करत असल्याचेही त्यांनी म्हटले होते. या ट्विटमध्ये एक पत्रदेखील देण्यात आले होते. ज्यावर काँग्रेस पक्षाच्या लेटरहेडवर सोशल मीडियावर कसे ट्वीट करायचे, तसेच कोणती माहिती वापरायची याबद्दल माहिती होती.

हेही वाचा - १२ वर्षांहून अधिक वयोगटाकरिता कोरोना लस प्रभावी- फायझरची केंद्राला माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.