ETV Bharat / state

Smoking in Air India Flight : परदेशी प्रवाशाकडून एअर इंडियाच्या विमानात धूम्रपान, गुन्हा दाखल - विमान धूम्रपान प्रकरण

एअर इंडियाच्या विमानामध्ये एका परदेशी प्रवाशाने धूम्रपान करण्याचा आणि प्रवाशांशी गैरव्यवहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अमेरिकन प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Smoking in Air India flight
एअर इंडियाच्या विमानात धूम्रपान
author img

By

Published : Mar 12, 2023, 5:14 PM IST

मुंबई : एअर इंडिया या विमानामध्ये याआधी सहा प्रवाशावर लघुशंका करणे, मद्यधुंद महिला प्रवाशाकडून कर्मचाऱ्यांना मारहाण यासारखे प्रकार घडले आहेत. आता एका विमानामध्ये एका परदेशी प्रवाशाने धूम्रपान करण्याचा आणि प्रवाशांशी गैरव्यवहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अमेरिकन प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विमानात धूम्रपान : ११ मार्च रोजी एअर इंडियाच्या लंडन ते मुंबई विमानातून एक अमेरिकन नागरिक असलेला प्रवासी प्रवास करत होता. विमानात धुम्रपान करण्यास परवानगी नाही. असे असताना हा प्रवासी बाथरूमध्ये गेला आणि धूम्रपान केले. यामुळे विमानामधील अलार्म वाजायला लागला. प्रवासी आणि क्रू मेंबर बाथरूमच्या दिशेने धावत गेले. तेव्हा त्या प्रवाशाच्या हातात ई सिगरेट आढळून आली. त्याच्या हातातील सिगरेट प्रवाशांनी काढून फेकली. त्यामुळे तो प्रवासी आक्रमक झाला. त्याला कसेतरी समजवून त्याच्या जागेवर बसवण्यात आले.

विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न : या परदेशी प्रवाशाने काही वेळाने विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रवासी घाबरले आणि त्याने विमानात नौटंकी करण्यास सुरुवात केली. क्रू मेंबर आणि प्रवासी यांनी या प्रवाशाचे हात पाय बांधून त्याला त्याच्या सीटवर बसवले. विमानात प्रवास करत असलेल्या एका डॉक्टरने त्या प्रवाशाची तपासणी केली असता त्याच्या बॅगेत ई सिगरेट आढळून आली. विमान मुंबई विमानतळावर आल्यावर त्या प्रवाशाला एअर इंडियाच्या क्रू मेंबरने सहार पोलिसांच्या ताब्यात दिले.

या कलमाखाली गुन्हा दाखल : या प्रवाशावर भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम ३३६, एअरक्राफ्ट अॅक्ट १९३७, २२, २३, २५ गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी मूळचा भारतीय आहे परंतु तो युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचा नागरिक आहे आणि त्याच्याकडे यूएस पासपोर्ट आहे. तो मद्यधुंद अवस्थेत होता की मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता याची पुष्टी करण्यासाठी आम्ही आरोपीचे नमुने वैद्यकीय चाचणीसाठी पाठवले आहेत असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

याआधी हे घडले आहेत प्रकार : एअर इंडियाच्या विमानात याआधी एका प्रवाशाने सह प्रवाशाच्या अंगावर लघुशंका केली होती. याबाबत सह प्रवाशाने केलेल्या तक्रारीनंतर संबंधित प्रवाशाला अटक करण्यात आली होती. त्या प्रवाशाला विमानातून प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली होती तसेच पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर एका मद्यधुंद महिला प्रवाशाने विमानातील क्रू मेंबरला मारहाण केली. काही वेळाने ही महिला आपले कपडे काढून अर्धनग्न अवस्थेत विमानात फिरत होती. विमान विमानतळावर आल्यावर या महिलेला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते.

हेही वाचा : Five Peoples Found Dead: दुर्दैवी, एकाच कुटुंबातील पाच जणांचा संशयास्पद मृत्यू, पोलिसांनी केला दावा, 'यामुळे' गेला जीव

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.