ETV Bharat / state

लॉकडाऊनचे उल्लंघन, मुंबईत 9 हजार जणांवर गुन्हे दाखल - people violating lockdown

मुंबईत संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी 4 हजार 648 प्रकरणात 9 हजार आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात 1 हजार 175 फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. 2 हजार 137 आरोपींना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे. तब्बल 5 हजार 791 जणांना जामिनावर सोडण्यात आले आहे.

मुंबईत 9 हजार जणांवर गुन्हे दाखल
मुंबईत 9 हजार जणांवर गुन्हे दाखल
author img

By

Published : Apr 22, 2020, 1:28 PM IST

मुंबई - देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना संक्रमनावर नियंत्रण मिळविण्यासाठी लॉकडाऊनचा काळ हा 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. मुंबई शहरात संचारबंदीसह कलम 144 लागू करण्यात आला आहे.

अशातही संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबईत 4 हजार 648 प्रकरणात 9 हजार आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात 1 हजार 175 फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. 2 हजार 137 आरोपींना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे. तब्बल 5 हजार 791 जणांना जामिनावर सोडण्यात आले आहे.

गेल्या चोवीस तासात मुंबई शहरात कलम 188 नुसार 165 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यात सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे तसेच अवैध वाहतूक प्रकरणी दक्षिण मुंबईतून 8 गुन्हे , मध्य मुंबईतून 61 , पूर्व मुंबईत 11, पश्चिम मुंबईत 52 व उत्तर मुंबईत 33 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.