ETV Bharat / state

ड्रीम्स मॉल आग प्रकरण : मॉल व रूग्णालय संचालकांविरोधात गुन्हा दाखल

भांडुप येथील ड्रीम्स मॉल मधील सनराईज हॉस्पिटलला गुरुवारी रात्री आग लागली होती. ही आग निष्काळजीपणामुळे लागल्याचे समोर आल्याने रुग्णालय प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dreams Mall fire case
ड्रीम्स मॉल आग प्रकरण
author img

By

Published : Mar 27, 2021, 9:49 AM IST

मुंबई - काल (26 मार्च) मुंबईतील भांडुप परिसरात असलेल्या ड्रीम्स मॉलमध्ये असलेल्या सनराइज रूग्णालयाला आग लागून झालेल्या दुर्घटनेमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 9 पुरुष व 2 महिलांचा समावेश आहे. या प्रकरणी भांडुप पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 'ड्रीम्स दी मॉल'चे संचालक राकेश कुमार, कुलदीप सिंग वाधवान, निकिता अमित सिंग त्रेहान, सारंग राकेश वाधवान, दीपक शिर्के व व्यवस्थापनातील अधिकारी, तर, सनराइज रूग्णालयाचे संचालक अमित सिंग त्रेहान, निकिता अमित सिंग त्रेहान, स्वीटी जैन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मॉल मालक व गाळे धारकांमध्ये सुरू आहे वाद -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 'ड्रीम्स दि मॉल' हा 'एचडीआयएल ड्रीम्स मॉल' या कंपनीच्या मालकीचा आहे. राकेश कुमार कुलदीपसिंग वाधवान, निकिता मिसिंग त्रेहान, सारंग राकेश वाधवान, दीपक शिर्के हे त्याचे संचालक आहेत. अमित सिंग त्रेहान, निकीता अमित सिंग त्रेहान व स्वीटी जैन हे सनराइज हॉस्पिटलचे संचालक आहेत. सध्या 'ड्रीम दि मॉल'चे संचालक व मॉलमधील गाळेधारक यांच्यामध्ये वाद सुरू असल्यामुळे हे प्रकरण नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलकडे आहे. मॉलमध्ये एकूण 1 हजार 180 गाळे व दुकाने असून त्यातील अंदाजे 40 टक्के गाळे हे सुरू होते. मॉलमध्ये तिसर्‍या माळ्यावर अर्ध्या भागात सनराइज हॉस्पिटल कार्यरत असून सदर हॉस्पिटल व नर्सिंग होम चालवण्याचे नोंदणी प्रमाणपत्र 1 ऑक्टोबर 2020 झाले होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. जानेवारी 2019 पासून सनराइज हॉस्पिटल हे कोविड सेंटर म्हणून कार्यरत होते. याबाबत अधिक चौकशी केली असता या हॉस्पिटलमध्ये अटी व शर्तींचे पालन न करता अग्निरोधक कार्यप्रणाली काम करत नसल्याचे समोर आले आहे.

आगीची चौकशी होणार -

आग लागलेल्या रुग्णालयाला आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोविड रुग्णालय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. फेब्रुवारी अखेरपर्यंत ही परवानगी होती. त्यांना एक महिन्याची परवानगी वाढवून 31 मार्चपर्यंत कशी वाढवण्यात आली याची चौकशी केली जाईल. या प्रकरणाची आणि आगीची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.