ETV Bharat / state

Mumbai Crime: आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीसमोर हस्तमैथून करणे कार चालकाला पडले भारी....वाचा सविस्तर - 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका कारचालकाने मुंबईत मुलीसमोर हस्तमैथून केल्याचा किळसवाणा प्रकार घडला आहे. त्याप्रकरणी ताडदेव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ताडदेव पोलिसांनी चालकाला अटक केली आहे. आरोपीचे नाव अब्दुल अहमद गौस मोहम्मद राहीनी वय २३ वर्षे असे आहे.

Mumbai Crime
आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीसमोर हस्तमैथून
author img

By

Published : Feb 8, 2023, 1:30 PM IST

मुंबई : मंत्रालयात काम करणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीसमोर एका कार चालकाने हस्तमैथून केल्याचा प्रकार घडला आहे. ही धक्कादायक घटना हाजी अली परिसरात घडली आहे. याप्रकरणी ताडदेव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे. आयएएस अधिकाऱ्याची पीडित मुलगी 6 जानेवारीच्या रात्री 9 वाजता हाजी अली येथून जात होती. कंपनीकडून पिक-अप आणि ड्रॉप सर्वीस देण्यात आली होती. तेव्हा त्या ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या चालकाने मुलीला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आपल्या कारजवळ बोलावले आणि अश्लील कृत्य केले. त्यामुळे मुलगी घाबरली.

पीडित मुलगी घाबरली : या प्रकारानंतर पीडित मुलगी घाबरली. घटनेच्या सुरुवातीलाच पीडित मुलीला थोडा संशय आला होता. तिने तिचा मोबाईलमध्ये व्हिडीओ सुरु केले होते. ती गाडीकडे गेली. कारजवळ जाताच ड्रायव्हरने मुलीला पाहून हस्तमैथून करायला सुरुवात केली. मुलीने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे म्हणजेच मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डींमुळे घटनेचा छडा लागला. कार चालकाने अश्लिल कृत्य करण्यास सुरूवात केल्यावर नंतर तिने आरडाओरडा केला. जेणेकरून आरोपीला पकडण्यासाठी लोक जमा झाले. मात्र, कार चालकाने तेथून पळ काढला आणि फरार झाला.

ताडदेव पोलिसांकडून आरोपीला अटक : या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ताडदेव पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर त्या भागातील सर्व सीसीटीव्ही तपासण्यात आले. पोलिसांना संबंधित वाहन अंधेरीतील एका कार्यालयात पोहोचल्याचे समजले. रात्रीची वेळ असल्याने कार्यालय बंद होते. अब्दुलचा मोबाईल देखील बंद होता. कार्यालय बंद असल्याने पोलिसांना कोणतीही माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे पोलिसांनी आरोपी चालकाचा रात्रभर कार्यालयाबाहेर व इतर २ ठिकाणी शोध घेतला. वाट पाहत असताना आरोपी चालक सकाळी कार्यालयात पोहोचताच रात्रभर अंधेरी येथील कार्यालयाबाहेर पहारा ठेवणाऱ्या पोलीस पथकाने आरोपीला अटक केली.

12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार: एनएम जोशी मार्ग पोलिसांनी 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. यात एका आरोपीने मुलीला धमकावले तर दुसऱ्या आरोपीने मुलीवर बलात्कार केला. मोईन शेख (35) पीडित मुलीच्या आणि कबीर शेख (25) अशी त्यांची नावे आहेत. मुलगी प्रेमाची कबूली आणि लग्नाला होकार देत नाही म्हणून तिला मारहाण करून तिच्यावर बलात्कार केला. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे मुलींच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे.

हेही वाचा : Mumbai Crime : 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्काराप्रकरणी दोन आरोपींना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.