मुंबई - केईएम रुग्णालयात एका 20 वर्षीय कॅन्सरग्रस्त रुग्णाने आत्महत्या केली. शहाजी असे नाव असलेला हा रूग्ण वॉर्ड क्रमांकमध्ये 11मध्ये रक्ताच्या कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी दाखल झाला होता. आजारपणाला कंटाळून त्याने बुधवारी रात्री गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
काही दिवसांपूर्वी शहाजीवर मुंबईतील इनलॅक्स रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. मात्र, पुढील उपचारासाठी त्याला केईएम रुग्णालयात पाठवण्यात आले. २ जुलै रोजी त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला वॉर्ड क्रमांक 11मध्ये उपचारासाठी ठेवण्यात आले. बुधवारी रात्री ८ रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना त्याचा मृतदेह लटकताना दिसला. याबाबत तत्काळ मृताच्या नातेवाईकांना आणि पोलिसांना माहिती देण्यात आली.
भोईवाडा पोलिसांनी मृत रुग्णाच्या नातेवाईकांचे आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले असून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. कोरोना आणि इतर दुर्धर आजारांच्या रुग्णांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसात वाढले असल्याचे चित्र आहे. आत्तापर्यंत अनेक कोरोनाग्रस्त रुग्णांनी आत्महत्या केल्याचे प्रकार घडले आहेत.