ETV Bharat / state

'थिसिस' रद्द करा..! पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची मागणी - mumbai mbbs student

द्वितीय वर्षाच्या निवासी डॉक्टरांनी थिसिस रद्द करण्याची मागणी केली आहे. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमानुसार पहिल्या वर्षापासून डॉक्टरांना एका विशिष्ट विषयावर पुढील 18 महिन्यात थिसिस पूर्ण करावा लागतो आणि तो आरोग्य विज्ञान विद्यापीठाला सादर करावा लागतो.

mbbs
'थिसिस' रद्द करा..! पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची मागणी
author img

By

Published : Jun 13, 2020, 2:46 PM IST

मुंबई - मुंबईसह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे, हे संकट कधी टळणार याबद्दल कल्पना नाही. अशा परिस्थितीत कोरोनाशी लढणाऱ्या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षार्थी डॉक्टरांनी परीक्षाच रद्द करण्याची मागणी उचलून धरली आहे. तर आता त्यापाठोपाठ द्वितीय वर्षाच्या निवासी डॉक्टरांनी (विद्यार्थी) 'थिसिस' अर्थात प्रबंध रद्द करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे त्यांनी तशी मागणी केली आहे.

राज्यातील सर्वच्या सर्व निवासी डॉक्टर आज कोरोना योद्धा म्हणून काम करत आहेत. मार्चपासून कोविड रुग्णालयात त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे मार्चपासून त्यांची शैक्षणिक कामे पूर्णतः बंद आहेत. कोरोना रुग्णालयामध्ये ते व्यस्त आहेत. त्यात अनेक निवासी डॉक्टर कोरोनाग्रस्त झाले आहेत. दरम्यान, मुंबईत डॉक्टरांची प्रचंड कमतरता आहे. अशावेळी परीक्षार्थी निवासी डॉक्टर परीक्षेमुळे कमी झाल्यास आरोग्य व्यवस्था कोलमडले असे म्हणत परीक्षेला विरोध होत आहे. तर परीक्षार्थी शारीरिक-मानसिकदृष्टया परीक्षेसाठी तयार नाहीत अशी तक्रार ते करत आहेत.

द्वितीय वर्षाच्या निवासी डॉक्टरांनी थिसिस रद्द करण्याची मागणी केली आहे. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमानुसार पहिल्या वर्षापासून डॉक्टरांना एका विशिष्ट विषयावर पुढील 18 महिन्यात थिसिस पूर्ण करावा लागतो आणि तो आरोग्य विज्ञान विद्यापीठाला सादर करावा लागतो. एकूणच द्वितीय वर्षाच्या डॉक्टरांना थिसिस सादर करावा लागतो. त्यानुसार आता येत्या काही महिन्यात थिसिस सादर करावा लागणार आहे. मात्र, हे सर्व विद्यार्थी मार्चपासून कामावर आहेत. त्यांचा अभ्यास आणि थिसिसचे काम करायलाही त्यांना वेळ नाही. त्यातच सध्या मोठ्या संख्येने द्वितीय वर्षाचे निवासी डॉक्टर कोरोना रुग्णच हाताळत आहेत. तेव्हा थिसिसचा डाटा कुठून आणि कसा जमा करायचा? असा प्रश्न आमच्या समोर असल्याची माहिती केईएम मार्डचे अध्यक्ष डॉ. दीपक मुंढे यांनी दिली आहे.

त्यामुळेच आम्ही थिसिस रद्द करण्याची मागणी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री आणि विद्यापीठाकडे केल्याचेही डॉ. मुंढेनी सांगितले आहे. तेव्हा आता विद्यापीठ यावर काय निर्णय घेते याकडेच द्वितीय वर्षाच्या निवासी डॉक्टरांचे लक्ष लागले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.