ETV Bharat / state

Mumbai Crime : नोकरीच्या शोधात आले अण अनिवासी भारतीयाची बॅग घेऊन पळाले, दोन भांमट्यांना पश्चिम बंगाल मधे अटक - रेल्वे पोलिस

रेल्वे पोलिसांनी (GRP) बोरिवली रेल्वे स्टेशनच्या वेटिंग रूममधून अनिवासी भारतीयाची बॅग चोरून पश्चिम बंगालला पळून गेलेल्या दोन भामट्यांना अटक केली आहे, मोहम्मद अर्शद आझाद आणि मोहम्मद इस्लाम इद्रीसी अशी अटक आरोपींची नावे आहेत.

two arrested in West Bengal
दोन भांमट्यांना अटक
author img

By

Published : Jan 26, 2023, 5:04 PM IST

मुंबई : बोरिवली रेल्वे स्टेशनच्या वेटिंग रूममधून अनिवासी भारतीयाची बॅग चोरून पश्चिम बंगालला पळून गेलेल्या दोन भामट्यांना अटक केली आहे. जीआरपी अधिकाऱ्यांनी सीसीटीव्हीच्या मदतीने या दोघांना अटक केली आहे तसेच त्यांच्या जवळून चोरीला गेलेली बॅगही जप्त करण्यात आली आहे. पोलीस चौकशीदरम्यान हे दोघे आरोपी मूळचे पश्चिम बंगालचे रहिवासी असून महिनाभरापूर्वी नोकरीच्या शोधात ते मुंबईत आल्याचे पोलिसांना समजले. मात्र, त्यांना कायमस्वरूपी नोकरी मिळाली नाही. त्यांनी शहरात काही आठवडे मजूर म्हणून काम केले. परंतु त्यांच्या मालकाने त्यांना पगार दिला नाही अशी माहितीही समोर आली आहे.

या दोघांनाही त्यांच्या मूळ गावी परत यायचे होते. पण रिकाम्या हाताने घरी गेल्यास घरचे नाराज होतील म्हणुन त्यांनी चोरी करण्याचे नियोजन केले. आणि ते बोरिवली रेल्वे स्थानकावर आले, त्यांनी प्रतीक्षालयात बसलेल्या तक्रारदाराला पाहिले आणि त्यांची बॅग चोरण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती बोरिवली जीआरपीच्या अधिकाऱ्याने दिली. तक्रारदार बालगोविंद शर्मा (६०) जे अमेरिकेत राहतात आणि भारत वंशाचे आहेत. पवईतील आयआयटी बॉम्बेमधील मित्रांना भेटण्यासाठी ते सुमारे 30 वर्षांनी भारतात आले होते असे सांगण्यात येत आहे.

६ जानेवारी रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास ते अहमदाबादहून रेल्वेने बोरिवली रेल्वे स्थानकावर पोहोचले. दुपारच्या सुमारास त्याच्या मित्रांनी भेटायचे ठरवले होते, म्हणून त्यांनी स्टेशनच्या वेटिंग रूममध्ये थांबायचे ठरवले. प्रवासात थकल्याने त्यांचा तिथेच डोळा लागला आणि सकाळी नऊच्या सुमारास ते झोपेतून जागे झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या मित्राला त्याच्या मोबाईलवर कॉल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेटिंग रूममध्ये नेटवर्कची समस्या असल्याने ते फोन करण्यासाठी वेटिंग रूममधून बाहेर पडले. ते परत वेटिंग रूममध्ये गेले असता बॅग गायब दिसली.

त्यांनी लगेच जीआरपी कार्यालय गाठले आणि तक्रार नोंदवली. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी वरिष्ठ निरीक्षक अनिल कदम यांच्या देखरेखीखाली पथक तयार करण्यात आले. आम्ही वेटिंग रूमचे तसेच प्लॅटफॉर्मवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि तांत्रिक विश्लेषणाचा वापर करून आरोपींचा शोध घेतला. त्यांना पश्चिम बंगालमधून पकडण्यात आले आणि टीमला चोरीची बॅगही जप्त करण्यात यश आले, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

या पिशवीत सुमारे ५० लाख रुपयांचे मौल्यवान साहित्य होते. लॅपटॉप, मोबाईल फोन, पासपोर्ट, घराच्या चाव्या आणि काही कपडे असा ५५ लाखांच्या वस्तुंचा यात समावेश होता. या दोघांवर चोरीचा गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा : Mumbai Crime: बनावट व्हिसा देऊन अनेकांना पाठविले विदेशात, आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.