ETV Bharat / state

मोदी सरकारचा लाखो कोटींचा घोटाळा कॅगने आणला समोर - जयंत पाटील - भाजप

मोदी सरकारने केलेला लाखो कोटीचा घोटाळा कॅगने समोर आणला असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

मोदी सरकारने केलेला लाखो कोटीचा घोटाळा सीएजीने समोर आणला असल्याचे जयंत पाटील यांचे म्हणणे
author img

By

Published : Mar 22, 2019, 11:13 PM IST

Updated : Mar 22, 2019, 11:53 PM IST

मुंबई - जानेवारी महिन्यात जाहीर झालेल्या 'कॅग'च्या अहवालामध्ये मोदी सरकारचा लाखो कोटी रूपयांचा घोटाळासमोर आला आहे. यावरून देशात नरेंद्र मोदी सरकारने किती आर्थिक गोंधळ घातलाय आणि आर्थिकेदृष्ट्या किती बेबनाव केलाय, याची खात्री आता देशातील जनतेला झाल्याशिवाय राहणार नाही, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.

मोदी सरकारने केलेला लाखो कोटीचा घोटाळा सीएजीने समोर आणला असल्याचे जयंत पाटील यांचे म्हणणे

कोणताही मोठा खर्च करण्यापूर्वी व त्यासाठी असलेल्या रकमांची माहिती विधानसभेत आणि संसदेमध्ये समोर आणली जाते. मोदी सरकारने सन २०१७-१८ या कालावधीत ९६ हजार ६१० कोटी म्हणजेच १ लाख कोटी रुपये संसदेपुढे न आणताच खर्च केले. यासंदर्भात जानेवारी महिन्यात 'ऑडिटर कॉम्प्युटर जनरल ऑफ इंडिया' (CAG) चा सन २०१७-१८ चा सीएजीने रिपोर्ट आणला असल्याचे पाटील यांनी सांगितले.

देशातील कोणत्याही विधानसभेत अथवा लोकसभेतही खर्च करावयाच्या रकमा या दाखवायची असतात. त्याशिवाय कोणतीही रक्कम खर्च करता येत नाही. परंतु, नरेंद्र मोदी सरकारने मात्र २०१७-१८ या वर्षांमध्ये ९६ हजार ६१० कोटी रुपये संसदेच्या समोर न आणताच परस्पर खर्च केलेत. त्यामुळे 'मै चौकीदार हूँ' या ज्या घोषणा दिल्या जात आहेत, त्याच चौकीदाराच्या नजरेसमोरच झालेले पाप हे पुन्हा उघड झालेले असल्याचा आरोप पाटील यांनी केला.

आपल्या देशात २ लाख कोटींपेक्षाही जास्त रक्कम सेसमधून जमा झाली आहे. त्याच्या रकमाही अन्यत्र वळविण्याचे पाप केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारने केले. यंदाचा सीएजीचा रिपोर्ट मोदी सरकारने आर्थिकदृष्ट्या कसे घोटाळाघातलेले आहेत हे स्पष्ट करणारा आहे. त्यामुळे देशात मोदी सरकारने किती आर्थिक गोंधळ घातला आहे आणि आर्थिक दृष्ट्या किती बेबनाव निर्माण केला आहे, याची खात्री आता देशातील जनतेला झाल्याशिवाय राहणार नाही, असेही जयंत पाटील म्हणाले.

नुकतेच फिच या रेटींग्स एजन्सीने आपल्या अहवालात जीडीपी ग्रोथ हा ६.८ टक्क्यांवर आला आहे, असे सांगतानाच शेती आणि उत्पादन क्षेत्रातील घट झाल्याचे स्पष्ट केले आहे. यासाठी मोदी सरकारने जे निर्णय घेतले ते चुकीचे ठरले आणि त्यामुळे जीडीपीचा दर मंदावला असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे मोदी सरकारचे निर्णय हे देशाला मारक ठरले असल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

Intro:मोदी सरकारने केलेला लाखो कोटीचा घोळ; सीएजीने आणला समोर -जयंत पाटील

मुंबई, ता. 22:

कोणता हे मोठा खर्च करण्यापूर्वी व त्यासाठी असलेल्या रकमांची माहिती विधानसभेत आणि संसदेमध्ये समोर आणली जाते, मोदी सरकारने सन 2017-18 या कालावधीत 96 हजार 610 कोटी रुपये संसदेच्या समोर न आणताच खर्च केले. आणि यातून मोदी सरकारचा लाखो कोटी रुपयांचा घोळ समोर आला आहे. यासाठी जानेवारी महिन्यात जाहीर झालेल्या सीएजीच्या रिपोर्ट मध्ये ही माहिती समोर आली आहे. यामुळे देशात नरेंद्र मोदी सरकारने किती आर्थिक गोंधळ घातलाय आणि आर्थिकदृष्ट्या किती बेबनाव केलाय याची खात्री आता देशातील जनतेला झाल्याशिवाय राहणार नाही, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

जानेवारी महिना ऑडिटर कॉम्प्युटर जनरल ऑफ इंडियाचा सन 2017-18 चा सीएजीनेकेंद्र सरकारच्या संदर्भात रिपोर्ट आणला आहे.या रिपोर्टमध्ये 96 हजार 610 कोटी म्हणजेच एक लाख कोटी रुपये सरकारने संसदेपुढे न आणताच खर्च केल्याचे चित्र समोर आले आहे.
देशातील कोणत्याही विधानसभेत अथवा लोकसभेतही खर्च करावयाच्या रकमा या दाखवायची असतात. त्याशिवाय कोणती रक्कम खर्च करते येत नाही. परंतु नरेंद्र मोदी सरकारने मात्र 2017-18 या वर्षांमध्ये 96 हजार 610 कोटी रुपये संसदेच्या समोर न आणताच परस्पर खर्च केलेत. त्यामुळे मै चौकीदार हूँ या ज्या घोषणा दिल्या जात आहेत, त्याच चौकीदाराच्या नजरेसमोरच झालेले पाप हे पुन्हा उघड झालेले असल्याचा आरोप पाटील यांनी केला.

आपल्या देशात दोन लाख कोटीपेक्षाही जास्त रक्कम सेसमधून जमा झाली आहे त्याच्या रकमाही अन्यत्र वळविण्याचे पाप केंद्रातील भाजपाच्या मोदी सरकारने केले. यंदाचा सीएजीचा रिपोर्टमध्ये मोदी सरकारने आर्थिकदृष्ट्या कसे घोळ घातलेले आहेत हे स्पष्ट करणारा आहे. त्यामुळे देशात मोदी सरकारने किती आर्थिक गोंधळ घातला आहे आणि आर्थिक दृष्ट्या किती बेबनाव निर्माण केला आहे याची खात्री आता देशातील जनतेला झाल्याशिवाय राहणार नाही असेही जयंत पाटील म्हणाले.

नुकतेच फिच या रेटींग्स एजन्सीने आपल्या अहवालात जीडीपी ग्रोथ हा 6.8 टक्क्यांवर आला आहे असे सांगतानाच शेती आणि उत्पादन क्षेत्रातील घट झाले झाल्याचे स्पष्ट केले आहे. यासाठी मोदी सरकारने जे निर्णय घेतले ते चुकीचे ठरले आणि त्यामुळे जीडीपी दर मंदावला असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे मोदी सरकारचे निर्णय हे देशाला मारक ठरले असल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

Body:mh-mum-22mar-jayantpatil-vr-modi-sanjeev

Conclusion:mh-mum-22mar-jayantpatil-vr-modi-sanjeev
Last Updated : Mar 22, 2019, 11:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.