ETV Bharat / state

कॅगने केली मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाची पोलखोल

पावसाळ्यात मुंबई शहरात उद्भवलेल्या आपत्तीजनक परिस्थितीत जिवीत आणि आर्थिक हानी होत असताना यातील धक्कादायक वास्तव कॅगने उजेडात आणले असल्याने महापालिकेच्या अनेक दाव्यांची पोलखोल झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात मुंबईत मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली आहे.

कॅगने केली मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाची पोलखोल
author img

By

Published : Jul 3, 2019, 3:42 AM IST

Updated : Jul 3, 2019, 3:54 AM IST

मुंबई - शहरातील रस्ते, गटारे, नाले आणि पावसाळ्यातील परिस्थिती हाताळण्यासाठी व त्याच्या देखभालीसाठी दरवर्षी शेकडो कोटींची कंत्राटे देण्यात येतात. ही कंत्राटे आणि त्यावर खर्च करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाची पूर्ण पोलखोल भारताचे नियंत्रक आणि महालेखापरिक्षक म्हणजेच कॅगने केली आहे.

पावसाळ्यात मुंबई शहरात उद्भवलेल्या आपत्तीजनक परिस्थितीत जिवीत आणि आर्थिक हानी होत असताना यातील धक्कादायक वास्तव कॅगने उजेडात आणले असल्याने महापालिकेच्या अनेक दाव्यांची पोलखोल झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात मुंबईत मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली आहे. मालमत्तेचे नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले आहे. रस्ते, रेल्वेमार्गावर पाणी साचल्याने मुंबईचे जनजीवन विस्ळकित झाल्याचे सध्याचे चित्र आहे. हेच चित्र दरवर्षी पावसाळ्यात उद्भवत असल्यामुळे कॅगने महापालिकेचे कान उपटले आहेत.

मिठी नदीच्या २२ किमीच्या रूंदीकरण व खोलीकरणाच्या कामांपैकी मार्च २०१८ पर्यंत फक्त १६ किमीची कामे पूर्ण झाली आहेत. १२ पूलांच्या बांधकामांपैकी केवळ ५ पुलांचे काम पूर्ण झाले आहे. दोन कामे प्रगतीपथावर आहेत. अन्य ५ पुलांचे बांधकामच सुरू झालेले नाही. पोईसर नदीच्या खोलीकरणावर २३० कोटी रूपये खर्चूनही हे काम केवळ ६० टक्क्यांच्या आसपासच झाल्याचे कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आले असल्याने महापालिकेचा ढिसाळ कारभार समोर आला आहे.

Intro:कॅगने केली मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाची पोलखोलBody:कॅगने केली मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाची पोलखोल

मुंबई, ता. २ :

मुंबईतील रस्ते, गटारे, नाले आणि पावसाळ्यातील परिस्थिती हाताळण्यासाठी व त्याच्या देखभालीसाठी दरवर्षी शेकडो कोटींची कंत्राटे आणि त्यावर खर्च करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाची पूर्ण पोलखोल भारताचे नियंत्रक आणि महालेखापरिक्षक म्हणजेच कॅग ने केली आहे.
पावसाळ्यात मुंबई शहरात उद्भवलेल्या आपत्तीजनक परिस्थितीत जीवित आणि आर्थिक हानी होत असताना या वास्तवावर त्यातील धक्कादायक वास्तव कॅग ने उजेडात आणले असल्याने महापालिकेच्या अनेक डाव्यांचा पोलखोल केला आहे.
यंदाच्या पावसाळ्यात मुंबईत मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली असून, मालमत्तांचे नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले आहे. तसेच रस्ते, रेल्वेमार्गावर पाणी साचल्याने मुंबईचे जनजीवन विस्ळकित झाल्याचे सध्याचे चित्र आहे. हेच चित्र दरवर्षी पावसाळ्यात उद्भवत असल्यामुळे कॅगने महापालिकेचे कान उपटले आहेत. 
मिठी नदीच्या २२ किमीच्या रूंदीकरण व खोलीकरणाच्या कामासाठी मार्च २०१८ पर्यंत फक्त १६ किमीची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच १२ पूलांच्या बांधकामांपैकी केवळ ५ पुलांचे काम पूर्ण झाले तर दोन कामे प्रगतीपथावर आहेत. अन्य ५ पुलांचे बांधकामच सुरू झाले नाही. पोईसर नदीच्या खोलीकरणावर २३० कोटी रूपये खर्चूनही हे काम केवळ ६० टक्क्यांच्या आसपासच झाल्याचे कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आले आले असल्याने महापालिकेचा ढिसाळ कारभार समोर आला आहे.Conclusion:
Last Updated : Jul 3, 2019, 3:54 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.