ETV Bharat / state

Byculla Fruit Market Moved : 98 वर्ष पूर्वीचा फळ बाजार हटवण्याचा महापालिकेचा निर्णय - महारेल

Byculla Fruit Market Moved : भायखळा येथील प्रसिद्ध 98 वर्षे जुनं फळ मार्केट हटवण्याचा मुंबई महानगरपालिकेने निर्णय घेताल आहे. भायखळा पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलाला 98 वर्षे पूर्ण झाल्यानं, तो धोकादायक बनला आहे. त्यामुळं या पुलाच्या पुढं नवीन पूल बांधण्यात येत आहे. नवीन पूल खुला झाल्यानंतर जुना पूल पुन्हा बांधण्यात येणार आहे. शहरातील ब्रिटीशकालीन पुलाच्या पुनर्बांधणीसाठी मुंबई महापालिका, महारेल यांच्यात करार झाला आहे.

Byculla Fruit Market Moved
Byculla Fruit Market Moved
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 3, 2023, 8:01 PM IST

Updated : Nov 3, 2023, 8:44 PM IST

फळांची विक्रेत्याची प्रतिक्रिया

मुंबई Byculla Fruit Market Moved : भायखळ्यातील प्रसिद्ध 'संत गाडगे महाराज भाजी मंडई'तील फळ बाजार हटवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेनं घेतला आहे. महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळ (महारेल) तसंच मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं या पुलाची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळं महापालिकेनं फळ बाजार हटवण्याचा निर्णय घेतलाय. या भाजीमार्केटमध्ये भाजीपाला फळांची विक्री करण्यात येते. सकाळी तसंच सायंकाळी हा परिसर ग्राहकानं ओसंडून वाहतो. त्यामुळं फळविक्रेत्यांनी दुपारच्या वेळेत इतर वस्तूंची विक्री करण्याची मागणी केली आहे. याबाबत महापालिका सकारात्मक विचार करेल, असं स्पष्टीकरण पालिका अधिकाऱ्यांनी दिलंय.

टप्प्याटप्प्याने होणार स्थलांतर : भायखळा येथील संत गाडगे महाराज भाजी मंडईची स्थापना 1939 ला करण्यात आली होती. त्यानंतर 1960 मध्ये या मंडईचा विस्तार करण्यात आला. ही मंडई 8039 चौरस मीटर जागेत विस्तारलेली असून या मंडईमध्ये एकूण 533 परवानाधारक आहेत. तसंच 140 फळ विक्रेते आहेत. इथल्या एकूण 140 फळ विक्रेत्यांपैकी 40 फळ विक्रेत्यांचं स्थलांतर पूर्ण झालंय. त्यांना मंडईतच तात्पुरती जागा देण्यात आली आहे. येथील फळ विक्रेत्यांचं स्थलांतर पूल उभारणीच्या आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्यानं करण्यात येणार असल्याचं मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. मात्र, फळ विक्रेत्यांनी भायखळ्यामध्येच राणीच्या बागेसमोरील मेहेर मंडईमध्ये जागा देण्याची विनंती केली आहे.

पुलाचे 35 टक्के काम पूर्ण : महापालिकेने फळ विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून दिल्यानं क्रेन, अवजड वाहनांच्या मदतीनं पुलाची प्राथमिक कामं पूर्ण झाली आहेत. कामाचा पुढील टप्पा हा (तुळई) गर्डर उभारण्याचा असून त्याच्या निर्मिती-जोडणीचे काम दमणमध्ये सुरू आहे. आता मंडईतील जागेच्या उपलब्धतेनुसार पुढील काम करण्यात येणार असल्याचं महारेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. नव्यानं निर्माण होणारा रेल्वेचा उड्डाणपूल हा 916 मीटर लांबी 9.70 मीटर उंचीचा असणार आहे. या पुलावर एकूण चार मार्गीका असून याचा खर्च 287 कोटी इतका आहे. हा पूल पूर्ण करण्याची कालमर्यादा ही 31 जुलै 2024 पर्यंत आहे.

हेही वाचा -

  1. Maratha Reservation : घर जाळण्याचा प्रकार इंग्रजांच्या काळात देखील झाला नव्हता - जयदत्त क्षीरसागर
  2. New Export Policy : राज्याचे नवे निर्यात धोरण, जाणून घ्या निर्यातीसाठी काय आहेत प्रस्ताव
  3. Morning Walk Issue: मॉर्निंग वॉकला न आल्याने मित्र पोहोचले बँड बाजासह; व्हिडिओ व्हायरल...

Last Updated : Nov 3, 2023, 8:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.