ETV Bharat / state

Tickets from home - आता घरात बसून युटीएसने रेल्वेचे तिकीट काढा - युटीएसद्वारे सहज तिकीट

प्रवाशांना मेल एक्सप्रेसचे तिकीट काढायचे असेल तर युटीएस या ॲपद्वारे २० किलोमीटरपर्यंत अंतरावरूनसुद्धा तिकीट काढता येईल. तर मुंबईत लोकल प्रवाशांसाठी दोन ते पाच किलोमीटरपर्यंत देखील ह्याद्वारे तिकीट काढण्याची मुभा दिली आहे. रांगेत उभे राहण्याची कटकट काही प्रमाणात कमी होईल.

आता घरात बसून युटीएसने रेल्वेचे तिकीट काढा

author img

By

Published : Nov 12, 2022, 2:38 PM IST

मुंबई - आता प्रवाशांना मेल एक्सप्रेसचे तिकीट काढायचे असेल तर युटीएस या ॲपद्वारे २० किलोमीटरपर्यंत अंतरावरूनसुद्धा तिकीट काढता येईल. तर मुंबईत लोकल प्रवाशांसाठी दोन ते पाच किलोमीटरपर्यंत देखील ह्याद्वारे तिकीट काढण्याची मुभा दिली आहे. रांगेत उभे राहण्याची कटकट काही प्रमाणात कमी होईल.

भारतीय रेल्वे महामंडळाने यु टी एस हे अनोखे ॲप आधीच कार्यन्वित केलेले होते. त्यामध्ये त्यांनी नवीन अद्ययावत सुविधा देण्याचा प्रयत्न केला. यु टी एस हे ॲप आधार आणि पॅनकार्ड याच्याशी जोडले गेलेले असल्यामुळे त्याची अधिकृतता, विश्वासार्हता यामुळे लाखो प्रवासी युटीएस हे एप्लीकेशन वापरतात. आणि रेल्वेचे तिकीट काढतात.

आता रांगेत उभे राहू नका - युटीएस ॲपयाद्वारे तिकीट काढायचे असेल तर स्टेशनच्या हद्दीजवळ एक किलोमीटरच्या आत असाल तरच आधी तिकीट काढायची मुभा होती. आता मात्र रेल्वेने ही अट काढून टाकलेली आहे. मुंबईतील लोकलचा प्रवास करायचा असेल तर दोन ते पाच किलोमीटरच्या अंतरामध्ये तुम्ही तिकीटद्वारे काढू शकतात तर मेल आणि एक्सप्रेस तिकीट काढायचा असेल तर २० किलोमीटर पर्यंतच्या परिघा मधून तुम्ही या ॲपद्वारे तिकीट काढू शकतात.त्यामुळे रांगेत उभे न राहता एप द्वारे तिकीट काढा.

मुंबईकरांसाठी खास लाभ होणार - रेल्वेचा मासिक किंवा त्रैमासिक पास संपल्यावर घरातून निघाल्यावर लक्षात येते की आपण पास संपला आहे. आता करायचे काय. तिकिटाच्या रांगेमध्ये उभे राहायचे, तर शंभर प्रवाशांची रांग असते. त्यानंतर आपल्याला तिकीट मिळणार. रांगेत उभे राहिल्याने 10 मिनिट तरी जातात. हा वेळ आता यामुळे वाचणार आहे. तसेच तुम्ही खेड्यातून निघालेला आहे आणि तालुक्याच्या ठिकाणी मेल आणि एक्सप्रेस असेल तर तुम्ही आता घरातूनच तिकीट काढू शकता. फक्त तुमचं घर रेल्वे स्टेशन पासून २० किलोमीटर अंतराच्या आत असलं पाहिजे.

युटीएसद्वारे सहज तिकीट - यासंदर्भात मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ईटीवी भारत सोबत बातचीत करताना या अद्ययावत सुविधा संदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, मुंबईचे लोकलचे प्रवासी असो किंवा मेल एक्सप्रेसने प्रवास करणारे प्रवासी असो त्यांना रांगेत उभे राहणे आणि तिकीट काढणे यामध्ये वेळ खर्ची पडत होता. जर कोणतेही प्रवासी, ज्यांना मेल आणि एक्सप्रेसने प्रवास करायचा असेल ते स्टेशनपासून वीस किलोमीटरच्या परिघाच्या आत असेल तर आणि मुंबई लोकलचे प्रवासी स्टेशनपासून पाच किलोमीटर अंतराच्या आत असतील तर त्यांना आता या युटीएसद्वारे सहज तिकीट काढता येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.